शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वडूजमध्ये गर्भपातासाठी आलेल्या बनावट जोडप्याचे बिंग फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 00:25 IST

वडूज : पती-पत्नीचे खोटे नाते कागदोपत्री तयार करून एक जोडपे गर्भपात करण्यासाठी मंगळवारी वडूजमधील एका खासगी रुग्णालयात आले. मात्र, ...

वडूज : पती-पत्नीचे खोटे नाते कागदोपत्री तयार करून एक जोडपे गर्भपात करण्यासाठी मंगळवारी वडूजमधील एका खासगी रुग्णालयात आले. मात्र, डॉक्टरांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर वडूज पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी बोगस जोडपे रुग्णालयात येताच पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना ताब्यात घेतले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडूज येथील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी (दि. ११) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भांडवलकर नावाचे जोडपे तपासणीसाठी आले. संजय भांडवलकर (रा. पाचवड, ता. माण) याने त्याची पत्नी गर्भवती असून, ती शिक्षण घेत आहे. त्यामुळे आम्हाला सध्या अपत्य नको असल्याचे त्याने डॉ. वेदिका माने यांना सांगितले. डॉ. माने यांनी संबंधित महिलेची सोनोग्राफी केली असता तीन महिन्यांचा जिवंत गर्भ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना दुसºया दिवशी बुधवारी रुग्णालयात येण्यास सांगितले. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भांडवलकर दाम्पत्य रुग्णालयात पुन्हा आले. त्यांना आधारकार्ड दाखविण्यास सांगितले. मात्र, प्रत्यक्ष दिसण्यावरून व आधारकार्डवरील माहितीवरून यात तफावत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तसेच डॉ. वेदिका माने यांचे पती डॉ. विवेकानंद माने हे संजय भांडवलकर यांचा मेव्हणा राजेश सुतार यांना ओळखतात. त्यामुळे साहजिकच संजय भांडवलकर याच्या पत्नीलाही ते ओळखत होते. हा प्रकार भलताच असल्याचे डॉ. विवेकानंद यांना समजल्यानंतर त्यांनी वडूज पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन दोघांना पोलीस ठाण्यात नेले.महिलेची प्रकृती बिघडली..पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर दोघेही पती-पत्नी नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करून भांडवलकरला अटक केली. तर संबंधित महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा हवालदार विकास जाधव अधिक तपास करत आहेत.