शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपारी’ शाबीत करण्यात अपयश

By admin | Updated: September 30, 2014 00:06 IST

बचाव पक्षाचा दावा : सल्याच्या घरी सापडलेली रक्कम ‘ती’ नव्हेच !

सातारा : महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या खुनासाठी मुख्य सूत्रधाराने गुंड सल्या चेप्याला दोन लाखांची सुपारी दिली होती, ही बाब शाबीत करण्यात सरकार पक्षाला अपयश आल्याचा दावा बचाव पक्षातर्फे आज,सोमवारी न्यायालयात करण्यात आला. सल्याच्या घरातून जप्त केलेले दोन लाख रुपये सुपारीचेच होते, हे सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाकडे ठोस पुरावे नाहीत, असा युक्तिवाद अ‍ॅड. श्रीकांत जाधव यांनी केला.जाधव म्हणाले, ‘या खटल्यातील साक्षीदार अभय पाटील हा अतुल भोसले यांच्या शिक्षण संस्थेत काम करतो. हे त्याने आपल्या जबाबात सांगितले नव्हते. सर्व आरोपींना मयत संजय पाटील ओळखत होते. ज्यावेळी ही घटना घडली. तेव्हा तेथे पिस्तूल घेऊन दोघे उभे होते. मात्र, संजय पाटील यांनी तोंडातून चकारशब्दही काढला नाही. हे विसंगत असल्याचे अ‍ॅड. जाधव यांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले.जाधव म्हणाले, ‘कोयना बँकेमध्ये उदय पाटीलबरोबर सल्या चेप्याला पाहिल्याचे साक्ष काहीनी दिली होती. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. सर्व आरोपींबाबत माफक पुरावा नाही. शिक्षा करतो, असे मनात आणले तरी शिक्षा देण्याइतपत पुरावे नाहीत. सागर परमार, हमीद शेखने हत्यारे काढून दिली. त्यावेळी सरकारी नोकरांना पंच म्हणून हाताखाली घेतले. हत्यारे जप्त केलेल्या ठिकाणाची चतु:सीमा एकच आहेत. मात्र त्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. अतुल भोसले, शशिकांत शिंदे आदी समर्थकांनी मोर्चा काढला. त्यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी पाटील मोर्चामध्ये सहभागी होते. मात्र, ते त्याच दिवशी पंचनामा केल्याचे सांगतायत. जप्त केलेली हत्यारे कोठे होती, हे साक्षीमध्ये दाखविले नाही. एकाही हत्यारावर सील केले नसून हत्यार जप्तीचा केवळ फार्स केला आहे,’ असे अ‍ॅड. जाधव यांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले. सल्या चेप्या तडीपार होता. त्या कालावधीत पोलिसांनी त्याच्यावर कोणती कारवाई केली, हे समोर आले नाही. या खटल्यातील सर्व साक्षीदार मयत संजय पाटील यांचे मित्र, गाववाले, नातेवाईक आहेत. तसेच घटनेनंतर सल्या चेप्याला कऱ्हाड न्यायालयात गोळ्या घालणारा महेश पाटील हा खटल्यातील पंच साक्षीदार आहे, हे विसंगत आहे. (प्रतिनिधी)