शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निधी देऊनही विकासकामे करण्यात अपयश...

By admin | Updated: October 30, 2016 01:01 IST

पृथ्वीराज चव्हाण : जयवंत पाटील म्हणे... अपप्रवृत्तीला ठेचण्यासाठी एकत्र

कऱ्हाड : ‘मुख्यमंत्री पदाच्या काळात मी शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, निधीच्या प्रमाणात त्या वेगाने विकासकामे करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले, अशी टीका करीत कऱ्हाडकरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी प्रथमच पालिका निवडणुकीत लक्ष घालत असून, यशवंत जनशक्ती आघाडीचे नेतृत्व मी स्वत: करणार आहे,’ अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. दरम्यान, जयवंत पाटील यांनी अपप्रवृत्तीला ठेचण्यासाठी एकत्र आल्याचे सांगितले.शनिवारी चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा संगीता देसाई, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, सुभाष डुबल, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, शारदा जाधव, अरुण जाधव, दिलीप जाधव, नगरसेवक बाळासाहेब यादव, श्रीकांत मुळे, स्मिता हुलवान उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत कऱ्हाडकरांनी भरघोस पाठिंबा दिला. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. कऱ्हाडकरांच्या विकासाबाबतीत अपेक्षा आहेत. त्यांनी स्वत:च निवडणुकीत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. म्हणूनच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रथमच पालिका निवडणुकीचे नेतृत्व करणार आहे. त्या दृष्टिकोनातून यशवंत विकास आघाडी, जनशक्ती आघाडी, लोकसेवा आघाडी या सर्वांना एकत्रित करून निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. आघाडीच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले असून, २ नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणार आहोत.’जयवंत पाटील म्हणाले, ‘पालिकेत सत्ताधारी म्हणून काम करणाऱ्या अपप्रवृत्तीला ठेचून काढण्याची गरज होती. म्हणून गत वर्षापासून माझे प्रयत्न सुरू होते. त्या दृष्टिकोनातून अनेकांशी चर्चा केली. आणि अखेर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’ राजेंद्र यादव म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कऱ्हाडसाठी भरघोस निधी दिला. कऱ्हाडच्या विकासाबाबत त्यांच्याकडे अनेक चांगल्या संकल्पना आहेत. म्हणून आम्ही यशवंत जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत. ’ (प्रतिनिधी)आघाडीच्या माध्यमातून निवडणूक...काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा विचार होता. मात्र, नियोजनासाठी वेळ कमी मिळाल्याने समविचारी लोकांना एकत्र करून आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत.