शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:10 IST

सातारा : कºहाड तालुक्यातील चार साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी मंगळवारी महसूलच्या पथकाने केली. रात्री उशिरापर्यंत हे पथक तपासणीत गुंतले ...

सातारा : कºहाड तालुक्यातील चार साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी मंगळवारी महसूलच्या पथकाने केली. रात्री उशिरापर्यंत हे पथक तपासणीत गुंतले होते; परंतु या तपासणीत काय निष्पन्न झाले, याबाबत कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. त्यातच कारवाई करण्याआधी गरजेची असणारी गोपनीयता मात्र पाळली जात नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या तपासणीवर बहिष्कार टाकला.जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर काटामारी करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून वारंवार केला जातो. या पार्श्वभूमीवर वजनकाटा तपासणीची उपविभागनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. प्रांताधिकाºयांच्या नेतृत्वाखाली असणाºया पथकात पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार, तलाठी, कोतवाल या शासकीय कर्मचाºयांसह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधींचाही समावेश करण्यात आला आहे.मंगळवारी कºहाड तालुक्यातील कृष्णा, सह्याद्री, रयत, जयवंत शुगर या कारखान्यांचे वजन काटे तपासण्यात आल्याची माहिती महसूलमधील सूत्रांनी दिली. ही कारवाई सकाळी नऊ वाजता सुरू झाली होती, ती रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती. मात्र, या तपासणीतून काय निष्पन्न झाले, हे मात्र समजू शकलेले नाही. गव्हाणीकडे गेलेले उसाचे ट्रॅक्टर, ऊसगाड्या, ट्रक परत बोलावून ते काट्यावरून नेण्यात आले. काट्यांची तपासणीही करण्यात आल्याची माहिती पथकातर्फे देण्यात आली. मात्र, कुठला कारखाना वजनकाट्यांमध्ये दोषी आढळला, याबाबत माहिती दिली नाही.वजनकाट्यांची तपासणी करण्यापूर्वी गोपनीयता जरुरीचे आहे. ज्या कारखान्यांबाबत संघटनांनी तक्रारी केल्या, त्या कारखान्यांवर अचानकपणे तपासणी पथक धडकणे जरुरीचे आहे. मात्र तसे न करता तलाठी, कोतवालांसह संपूर्ण यंत्रणेला जागे करून करण्यात येणारी तपासणी म्हणजे केवळ फार्स असल्याची टीका स्वाभिमानीने केली आहे.तपासणी हा केवळ फार्स..कºहाड तालुक्यातील कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी मंगळवारी करण्यात आली. मात्र ही तपासणी केवळ फार्स आहे. वजनकाट्यांच्या धाडपथकाने गोपनीयता पाळून कारवाई केली नसल्याने या मोहिमेवर बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिली.