शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नवे कपडे पाहून खुलले चिमुरड्यांचे चेहरे !

By admin | Updated: September 13, 2015 22:18 IST

महिगावची कातकरी वस्ती : जयश्री गिरी यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप

कुडाळ : शाळा शिकण्याची, इतर मुलांप्रमाणे खूप मोठे होण्याचे स्वप्ने या मुलांनीही पाहिलं; पण परिस्थिती साथ देत नाही... चांगली पुस्तकं, स्वच्छ कपडे मिळत नसल्याने शिकण्याची इच्छाच राहत नाही. याच मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी महिगाव येथील कातकरी वस्तीमधील वीस विद्यार्थ्यांना उपसरपंच जयश्री गिरी यांच्या हस्ते गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.महिगाव, ता. जावळीच्या जवळ असलेल्या कातकरी वस्तीमधील विद्यार्थ्यांना इतर मुलांच्या बरोबरीने शिक्षण मिळावे म्हणून शाळा आहे. मात्र, भौतिक सुविधा पुरेशा मिळत नाहीत. त्यामुळे या मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी गिरी यांच्या हस्ते गणवेश व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. नवा गणवेश पाहून या वस्तीमधील मुलांची चेहरे खुलली होती. त्यांचा आनंद चेहऱ्यावरून लपत नव्हता; पण हे दृश्य पाहणाऱ्यांच्या पापण्याच्या कडा मात्र ओलावल्या होत्या. या वस्तीवरील अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी गावातील युवक मयूर भोसले हा प्रयत्न करत आहे. वस्तीमधीलच्या वीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. यावेळी सदस्य कुसूम जाधव, जगन वाघे, जिजाबाई वाघे, कल्पना भोसले, रोहिदास भोसले, मयूर भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)गावालगत असलेल्या वस्तीमधील नागरिकांना अवश्यक सुविधा पुरवून त्यांच्या वस्तीतील विकासकामांना प्राधान्य देऊन, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- जयश्री गिरी, उपसरपंच महिगाव.