शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी

By admin | Updated: June 22, 2015 00:15 IST

वीजपुरवठा खंडित : चोवीस तासात ११0 मिलिमीटर पावसाची नोंद

शिराळा/वारणावती/सागाव : चांदोली धरण परिसरात गेल्या २४ तासात ११० मिलिमीटर पाऊस झाला असून अतिवृष्टीची नोंद झाली आहे. संततधार पावसाने धरणाची पाणी पातळी पाऊण मीटरने वाढली आहे. मुसळधार पावसामुळे परिसरातील वीज २४ तासांपासून खंडित झाली आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील सोनवडे, मणदूर, आरळा, चांदोली परिसरात गेले दोन दिवस संततधार सुरू आहे. पावसामुळे परिसरातील भात पिकात पाणी साचले आहे. गेल्या ४८ तासात १४५ मि.मी., तर २४ तासात ११0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणातील पाणी पातळी (0.७५ मीटरने) वाढली आहे. सध्या धरणात १८.६८ टी.एम.सी. (५२९.१७ द. ल. घ. मी.) पाणीसाठा आहे, तर वीज निर्मिती केंद्रातून ५४२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. संततधार पावसाने व विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीतही काहीशी वाढ झाली आहे. आरळा-शित्तूर रस्त्यावरील वारणा नदीजवळ दलदलीमुळे लोकांची कसरत सुरू आहे. तालुक्यातील सागाव, नाटोली, चिखली, कांदे, भाटशिरगाव, वाडीभागाई, ढोलेवाडी, कणदूर, पुनवत, फुफिरे परिसरात शनिवारी रात्रीपासून संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी शेताचे बांध फुटले असून, शेतकऱ्यांची आडसाली उसाची लागण पडली आहे. भाताच्या व उसाच्या पिकामध्ये पाणी साचले आहे. विहिरीवरील मोटारी काढून ठेवण्यासाठी धावपळ सुरू असून जनावरेही माळरानातून हलविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग रविवारी सुरू होती. मान्सून सक्रिय झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)/एकूण पाऊस चोवीस तासातील व आतापर्यंत झालेला पाऊस कंसात असा - शिराळा ५७ (१२० मि.मी.), शिरशी ३२ (६६), कोकरुड ६० (१५०), चरण ४५ (१५४), सागाव ६८ (१५०), मांगले ७१ (१५१), चांदोली धरण परिसर ११० (२७०).