शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

घरात स्फोट; कऱ्हाडात कुटुंबातील पाचजण गंभीर, भीषण स्फोटाने मुजावर कॉलनी हादरली

By संजय पाटील | Updated: October 25, 2023 10:26 IST

घराची पडझड

कऱ्हाड : येथील मुजावर कॉलनीत बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने मुजावर कॉलनी हादरली असून स्फोटात शकिल मुल्ला यांच्या कुटूंबातील पाचजण जखमी झाले आहेत. स्फोट एवढा जबरदस्त होता की घराच्या भिंतींचीही पडझड झाली आहे. या घटनेमुळे मुजावर कॉलनी परिसरात प्रचंड धावपळ उडाली. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे शकील मुल्ला कुटूंबासह राहतात. बुधवारी सकाळी त्यांच्या घरात अचानक स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मुल्ला कुटूंबियांना बचावासाठी धावण्याची संधीच मिळाली नाही. स्फोटात मुल्ला कुटूंबातील पाचजण जखमी झाले. स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की संपुर्ण मुजावर कॉलनी परिसर हादरून गेला. या स्फोटाने मुल्ला कुटूंबाच्या घराच्या भिंतींची पडझड झाली. या स्फोटाने घराला आग लागली.

घटना निदर्शनास येताच नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांनी धावपळ करत आग आटोक्यात आणली. जखमींना कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून नेमका स्फोट कशाचा झाला, याची माहिती घेतली जात आहे.घरातील सिलेंडर सुरक्षित सुरक्षित

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता मुल्ला कुटुंबीयांच्या घरात गॅसचे तीन सिलेंडर आढळून आलेले आहेत. मात्र तिन्ही सिलेंडर सुरक्षित आहेत. तसेच शेगडीही सुस्थितीत आहे. त्यामुळे हा स्फोट सिलेंडरचा झाला नसावा अशी दाट शक्यता आहे. स्फोटाचे नेमके कारण पोलिसांकडून शोधले जात आहे.