शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षा १८ची; मिळाले ३५ कोटी

By admin | Updated: January 29, 2015 23:29 IST

वाळू लिलाव : तीन तालुक्यांतील पंधरा ठेक्यांची बोली पूर्ण

सातारा : वाळू लिलावाच्या पहिल्या टप्यात सातारा, कऱ्हाड आणि कोरेगाव तालुक्यांतील १५ ठेक्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोली लावण्यात आली. यामधून महसूल विभागाला १८ कोटी ४५ लाख रुपयांची अपेक्षा होती. मात्र, लिलावातील बोलीतून ही रक्कम दुप्पट होऊन चक्क ३४ कोटी ९० लाख रुपये मिळाले आहेत.जिल्ह्यात वाळूचे एकूण ४७ ठेके असून लिलावातून सरकारी तिजोरीत कोट्यवधींचा भरणा होत असतो. गुरुवारी झालेल्या बोलीतून अपेक्षेपेक्षा दुप्पट भरणा मिळाली. पुढची फेरी खटाव, फलटण, वाई तालुक्यांसाठी १ फेबु्रवारीला होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उत्खनन विभागाच्या प्रमुख रंजना ढोकळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सातारा, कऱ्हाड, कोरेगाव या तालुक्यातून नदी जात असल्याने या भागातील वाळू ठेक्यांसाठी लागलेल्या बोलीतून महसूल विभागाला अपेक्षेपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. त्यामुळे आगामी फेऱ्यांकडे महसूल विभागाबरोबर तालुक्यातील वाळू माफियांचे लक्ष लागून राहिले आहे. वाळू लिलावाची ही पद्धत ई-टेंडरिंगद्वारे करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली. (प्रतिनिधी)