शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

‘घरगुती काँग्रेस’ला हद्दपार करा

By admin | Updated: February 12, 2017 22:28 IST

मदनदादा मोहिते : गोंदी येथे उमेदवार प्रचारार्थ सभा; सगळीच पदे घरात वाटून घेतली

कऱ्हाड : ‘मी मंत्री, तू आमदार, तू जिल्हाध्यक्ष, तू खजिनदार... अशी सगळी पदे घरातच वाटून घेणारी ‘घरगुती काँग्रेस’ कऱ्हाड तालुक्यात निर्माण झाली असल्यामुळे या काँग्रेसचा मी त्याग केला आहे. मतदारांनीही आता अशा ‘घरगुती काँग्रेस’ला कऱ्हाड तालुक्यातून कायमचे हद्दपार करा,’ असे आवाहन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनदादा मोहिते यांनी केले.गोंदी, ता. कऱ्हाड येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.याप्रसंगी भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, भाजपाच्या रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शामबाला बबन घोडके, शेरे पंचायत समिती गणाचे उमेदवार बाळासाहेब निकम, उपसरपंच किशोर पवार, कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक लालासाहेब पवार, माजी उपसरंपच गुणवंतराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य हणमंत मदने, प्रकाश कुंभार, गोंदी विकास सोसायटीचे उमेदवार विजय पवार, उपाध्यक्ष धर्मेंद्र माने, संचालक दिलीप पवार, रमेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर टीका करताना मदनदादा मोहिते म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण हे दरबारी राजकारणात मुरले आहेत. पण असले राजकारण या भागात चालत नाही. जनमत वाढविण्यासाठी लोकांत मिसळणे महत्त्वाचे आहे, असे वारंवार सांगूनही त्यांनी माझ्या सांगण्याकडे कधीच लक्ष दिले नाही. केवळ निधी वाटून माणसे मागे येत नाहीत, हे आता त्यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे.’मोहिते-भोसले मनोमिलनावर भाष्य करताना पुढे मोहिते यांनी स्पष्ट केले की, ‘आमच्या घराण्यात कर्तबगार मंडळी असूनही संघर्षामुळे घराण्याचे मोठे नुकसान झाले आहे. संघर्षात नेहमी दुसऱ्याचा फायदा होत असल्यानेच आम्ही दोन्ही कुटुंबांनी कटुता संपवून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनीही आपापसातील मतभेद मिटवून भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसावी. भविष्यात आमदार होण्याची उमेद केवळ अतुलबाबांच्यात असून, त्यांना आमदार करणे हेच माझे ध्येय आहे.’ भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘केंद्र आणि राज्यपाळीवरून निधी खेचून आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही आपल्या विचारांचे लोक निवडून येणे गरजेचे आहे. निवडणूक तोंडावर आली तरी विरोधी आघाड्यांमध्ये अजूनही अनिश्चितता आहे. गट कुणी लढवायचा आणि गण कुणी लढवायचा याबाबत संभ्रमावस्था आहे. चिन्हाचा तर अजून पत्ताच नाही. अशा परिस्थितीत भाजपाच्या उमेदवारांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली असल्याने आपला विजय निश्चित आहे.’अर्जुन पवार यांनी स्वागत व प्रास्तविक केले. संदीप यादव यांनी सूत्रसंचालन केले. विजय पवार यांनी आभार मानले. गोंदी, शेरे या भागातील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)