शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडून विकासाचा आव : गोरे

By admin | Updated: October 21, 2015 21:41 IST

आडवे जाणाऱ्यांना आडवे करू

दहिवडी : ‘माण-खटावचा लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या सहा वर्षांत शेकडो सिमेंट बंधारे उभारले, रस्त्यांचे जाळे निर्माण केले. वीज, पाण्याच्या सुविधा निर्माण केल्या; मात्र या कामांचा गवगवा केला नाही. विरोधक मात्र पाच-पन्नास हजारांची कमान ठोकून आणि रस्त्यावर मुरुम टाकून विकासाचा आव आणत आहेत. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक १,४७५ कोटींचा निधी आणण्यात यश आले. यापुढेही माण-खटावच्या विकासाची प्रक्रिया जोमाने सुरू ठेवणार आहे,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.कोळेवाडी, ता. माण येथे जिल्हा नियोजनमधून बांधण्यात येणाऱ्या १७ लाखांच्या बंधाऱ्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. माजी शिक्षण सभापती अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, माढा लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ भोसले, चांगदेव सूर्यवंशी, हणमंतराव काटकर, तानाजी जायकर, सरपंच पुष्पलता सूर्यवंशी, चंद्रकांत रोमण, बाबा मदने, मंगेश रोमण, शामराव सूर्यवंशी, शंकर सूर्यवंशी, बाजीराव रोमण, किशोर नामदास, धनाजी मदने, बबन साळुंखे, उपसरपंच तावरे, लक्ष्मण जाधव, सत्यवान रोमण, नारायण रोमण आदी उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, ‘वाड्या-वस्त्यांवर विकासकामे पोहोचविण्यावर मी नेहमीच भर दिला. माण-खटावच्या मातीचा दुष्काळ हटवायचा निश्चय करूनच गेल्या पाच वर्षांत सिमेंट बंधारे पाणलोट, तलाव दुरुस्तीची शेकडो कामे केली. एकाचवेळी ९० गावांमधील अंतर्गत रस्ते मंजूर करून रस्त्यांचे जाळे निर्माण केले. साखळी सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होऊन शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. सध्या जनता केलेल्या कामांपेक्षा विकासाशी देणे-घेणे नसणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडत असल्याचे शल्य वाटते. आडवे जाणाऱ्यांना आडवे करू आपण कोट्यवधींची कामे गावोगावी साकारली आहेत. त्या कामांचा आपण गवगवा केला नाही; मात्र रस्त्यावर कमान उभारून आणि मुरूम पसरून गवगवा करणारे जनतेची दिशाभूल करत आहेत. यापुढे प्रेमाने आमच्याकडे येणाऱ्यांवर आम्हीही प्रेम करू. मात्र, आम्हाला आडवे जाणाऱ्यांना आडवेही करू,’ असा इशाराही त्यांनी दिला अ‍ॅड. भास्कराव गुंडगे म्हणाले, आ. गोरेंनी उभारलेल्या बंधाऱ्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.’