शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘तहसील’ परिसर झाला स्वच्छ !

By admin | Updated: November 21, 2014 00:27 IST

विद्यार्थ्यांचा पुढाकार : कर्मचाऱ्यांनी घेतला मोकळा श्वास--लोकमतचादणका

वडूज : घाणीची दुर्गंधी व मोठेले डास यामुळे तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या व येथील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. या संदर्भात ‘लोकमत’ने गुरुवारी (दि. १३) ‘तहसीलमध्येच डेंग्यूला आमंत्रण’ या असे वृत्त प्रसिद्ध केली होती. त्याचाच परिणाम तहसील कार्यालयाचा परिसर स्वच्छ झाला आणि येथील कर्मचाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला.या परिसरातील स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी नसल्याने हा परिसर वारंवार अस्वच्छ असतो. राज्यात डेंग्यूसदृश परिस्थितीत निर्माण झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांच्या दालनात यासंदर्भात १५ दिवसांपूर्वी जनजागृती बैठक पार पाडली. परंतु, याच दालनाच्या मागील बाजूस घाणीचे साम्राज्य साठून डासांचे प्रमाण वाढले होते. याचाच परिणाम येथील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत होता. दुर्गंधीपासून आणि डासांपासून संरक्षणासाठी दिवसा पंखे व डास निर्मूलन अगरबत्ती लावून येथील कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात. याचाच फटका दस्तूरखुद्द तहसीलदार विवेक साळुंखे यांनाच बसला. पाच दिवसांपूर्वी तेच स्वत: तापाने आजारी होते. सलग चार दिवस रजेवर जाऊन त्यांनी विश्रांती घेतली. त्यानंतर ते पुनश्च हजर झाल्यानंतर सर्वप्रथम तहसील परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.तहसील कार्यालय परिसरात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व शौचालय दुरुस्ती तातडीने करणार असल्याचे तहसीलदार विवेक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)खराट्यांचा खडखडाट...सध्या स्वच्छता मोहीम वडूज परिसरात सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून खराटे विकत आणले आणि त्याचा वापर झाल्यानंतर शाळेस भेट दिले. त्यामुळे वडूज बाजारपेठेतील सर्व दुकानातील खराटे संपल्याने बाजारपेठेत खराट्यांचा खडखडाट जाणवू लागला आहे.ही ‘स्वच्छता मोहीम’ राबविताना छत्रपती शिवाजी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. या स्वच्छतेच्या कामी लागणारे खराटे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून आणून स्वच्छता केल्याने बाजारपेठेतेत गर्दी झाली होती.