शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘केस’ हाताळणाऱ्यांची केशरचनेतही सरशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:33 IST

सातारा जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा मात्र यात केशरचना स्पर्धांचा समावेश करण्यात आला. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर दिलेल्या निर्धारित वेळेत केशरचना करणं बंधनकारक होतं.

ठळक मुद्देमेहंदीलाही प्रतिसाद

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : न्याय व्यवस्था टिकविण्याबरोबरच कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेत शेकडो केसेस जिल्हा न्यायालयात हाताळल्या जातात. त्याच न्यायालयाच्या बार रूममध्ये केशरचनांची अनोखी स्पर्धा पार पडली. न्याय निवाड्याच्या केसेस हाताळणा-या हातांनी केशरचनेतही आपली सरशी असल्याचे दाखवून दिले.

सातारा जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा मात्र यात केशरचना स्पर्धांचा समावेश करण्यात आला. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर दिलेल्या निर्धारित वेळेत केशरचना करणं बंधनकारक होतं. केशरचना करताना कोणत्याही वस्तूंचा वापर टाळण्याचा नियमही या स्पर्धेत घालण्यात आला होता. त्यामुळे ही स्पर्धा थोडी क्लिष्ट होती. पण तरीही स्पर्धकांनी आपल्यातील उत्तम कलांचे प्रदर्शन दर्शवत उत्तम केशरचना सादर केल्या.

पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या केशरचना या स्पर्धेत तब्बल दहा जणींनी सहभाग नोंदविला. यात अ‍ॅड. वंदना संकपाळ, अ‍ॅड. प्रीतम महांगडे, अ‍ॅड. वैशाली निकम साळुंखे, अ‍ॅड. सुचेता कोकीळ, अ‍ॅड. सोनाली तोडकर, अ‍ॅड. मनीषा पवार, अ‍ॅड. स्वाती जगताप, अ‍ॅड. अपर्णा मुके, अ‍ॅड. वृषाली गाढवे यांचा समावेश आहे. परीक्षक म्हणून सौंदर्यतज्ज्ञ डॉ. मृणालिनी कोळेकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेत अ‍ॅड. प्रीतम महांगडे प्रथम, अ‍ॅड. वैशाली निकम-साळुंखे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण खोत, उपाध्यक्ष अ‍ॅड. संग्राम मुंढेकर, सचिव अ‍ॅड. अभिजित घोरपडे, सहसचिव अ‍ॅड. राजश्री सावंत, खजिनदार अ‍ॅड. अभिजित यादव, अ‍ॅड. महेश कुलकर्णी यांनी विशेष प्रयत्न केले. अ‍ॅड. राजश्री सावंत आणि अ‍ॅड. सुश्मिता धुमाळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. दरम्यान, जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने यंदा रांगोळी आणि पाककृती स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  • जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मेहंदी स्पर्धेलाही महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर या स्पर्धा घेण्यात येतात. त्यामुळे काम संपल्यानंतर मिळणाऱ्या वेळेत मेहंदी स्पर्धा पार पडल्या. एकसे एक मेहंदी या स्पर्धेसाठी रेखाटण्यात आल्या.
टॅग्स :Courtन्यायालय