शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वाजण्यापूर्वीच डीजेचा गळा आवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 23:57 IST

खंडाळा : गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण करणारी यंत्रणा वापरण्यास उच्च न्यायालयाने तूर्तास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे मंगळवारी दोन डीजे जप्त करण्यात आले. ही यंत्रणा पोलिसांनी सील केली आहे.गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषणहोऊ नये, यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले ...

खंडाळा : गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण करणारी यंत्रणा वापरण्यास उच्च न्यायालयाने तूर्तास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे मंगळवारी दोन डीजे जप्त करण्यात आले. ही यंत्रणा पोलिसांनी सील केली आहे.गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषणहोऊ नये, यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले आहेत. यानुसार खंडाळा पोलिसांनी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अहिरे गावातील नंदकुमार शिवाजी अहिरे यांच्या मालकीची ध्वनिक्षेपक यंत्रणेसह वाहन (एमएच ०४ एजी ४३३९)जप्त करण्यात आले. तसेच रमेश दत्तू पवार (रा. अहिरे) यांच्या मालकीचे वाहन(एमएच १२ आरए ६९१) हे वाहनध्वनिक्षेपक यंत्रणेसह जप्त करून सील केले आहेत.जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत असणारी सर्व ध्वनिक्षेपक यंत्रे गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत दोन्ही व्यावसायिकांना जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची माहिती देण्यात आली असून, त्यामुळे ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.खंडाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार विजय पिसाळ, नितीन नलवडे, गिरीश भोईटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.