कोपर्डे हवेली : ‘राज्यात विधानसभेचा प्रचार अंतिम टप्यात पोहोचला असताना अनेक ठिकाणी दबावाचे राजकारण व सभा उधळण्यासारख्या अनेक लोकशाही विरोधी घटना घडण्यास सुरुवात झाली आहे. मनोज घोरपडे यांच्या कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड येथे सांगता भेटीसाठी सागर खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. सभा सुरू झाल्यावर अंधाराचा फायदा घेत विरोधक कार्यकर्त्यांनी सभा उधळून लावण्यासाठी व्यासपीठाच्या दिशेने दगडांचा वर्षाव करण्यास सुरुवात केला, तरीही टाळ्यांचा कडकडाटात सभा झाली. दरम्यान, या दगडफेकीत दिनेश भोसले (रा. काशीळ) या युवकास लागून त्यांच्या डोक्याला जखम झाली. तर इतर कार्यकर्ते किरकोळ जखमी झाल्याने सभास्थळी एकच गोंधळ झाला. यावेळी गावातील कार्यकर्त्यांनी व मनोज घोरपडे यांनी जमावास शांत केले; पण घडल्या प्रकारानंतर मात्र, कार्यकर्त्यांच्या मनात हत्तीचे बळ आल्याने त्यांनी सभा होणार हा निर्णय घेतला.यावेळी सागर खोत म्हणाले, ‘सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कैवारी व विकासाचे जनक म्हणून समाजविघातक कामे करणाऱ्या विरोधकांचे खरे रूप सर्वसामान्यासमोर आले आहे. विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांवर हा हल्ला केला तर केलाच; पण लोकशाहीला ठोकर मारण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे ऊसदरासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची पाठ सोडणाऱ्या या सत्ताधाऱ्यांनी सत्ता मिळविण्यासाठी आता गोरगरीब जनतेची रक्त सांडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे त्यांना आता तरी योग्य जागा दाखवा,’ असे ते म्हणाले.घोरपडे म्हणाले, ‘घडलेला प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा असून, विरोधकांनी विकासकामाचे राजकारण करावे, शेतात घाम गाळून पोटाची खळगी भरणाऱ्या गरिबांच्या मुलांची डोकी फोडून राजकारण होतनाही. मात्र, स्वाभिमानींच्या कार्यकर्त्यांना मात्र एक सल्ला आहे की आपण असे कोणतेही काम करू नका. त्यामुळे सर्वसामान्यांचा त्रास होईल येणाऱ्या निवडणुका शांततेत पार पाडाव्यात. मतदारसंघात चाललेली विरोधकांची दादागिरी जनताच मोडीत काढणार असून, भविष्यात या मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती लागणारे उद्योगधंदे, व्यवसाय, एमआयडीसी सारखे उद्योग त्याचे विस्तारीकरण करण्यात तसेच शेतकऱ्यांच्या शेतीला सर्वसुविधा पुरवणे, व सर्व व्यापारी वर्गाच्या अडचणी सोडवणार आहोत, ’ असे मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)भोळ्याभाबड्या जनतेची वर्षोनुवर्षे फसवणूकमूळच्या कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील चोरे भाग मसूर (पूर्व) आणि उत्तर भाग हा पूर्वीपासूनच सर्वच प्रकारच्या विकासापासून विद्यमान लोकप्रतिनिधीनी वर्षानुवर्षे जाणून बुजून वंचित ठेवण्याचे पाप केलेले आहे. सध्याच्या कऱ्हाड उत्तरमधील पुसेसावळी व कोरेगाव तालुक्याच्या समाविष्ट भागामधील परिस्थिती तर खूपच भीषण आहे. भोळ्याभाबड्या जनतेने वर्षानुवर्षे त्यांना सत्ता दिली. त्या जनतेचे प्रेम अपेक्षा त्यांना कळल्या नाहीत. तालुक्यातील सर्वच सत्ता त्याच्यांच ताब्यात आणि त्यांच्याच घरात त्यांनी डांबून ठेवल्या. त्यांना जनतेच्या प्रेमातून उतराई व्हावे, असे कधीच वाटले नाही. छोट्या कार्यकर्त्यांना आणखी मोठे होऊन द्यायचे नाही व मोठ्या कार्यकर्त्यांना आणखी पुढे जाऊन द्यायचे नाही. गुणी निष्ठावान सामान्य कार्यकर्त्यांची उगीच गळचेपी करायची. विशेष करून शेतकरी आणि युवावर्ग प्रथमच त्वेषाने पेटून उठला आहे.’
दगडफेकीनंतरही घोरपडेंची सभा टाळ्यांच्या कडकडाटात
By admin | Updated: October 13, 2014 23:04 IST