शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उद्रेक; १२ दिवसांत ८ हजार ८०० बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:37 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मृत्यूचे ...

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मृत्यूचे तांडवही सुरू झाले आहे. जिल्ह्यात दि. १ ते १२ एप्रिल या कालावधीत तब्बल ८ हजार ८०० नवे रुग्ण आढळून आले असून, ७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधितांचा हा गेल्या सात महिन्यांतील सर्वात मोठा उच्चांक आहे.

एप्रिल महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरश: उद्रेक सुरू झाला आहे. दररोज ७०० ते ९०० रुग्ण आढळून येऊ लागल्याने चिंतेत भर पडू लागली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. या प्रयत्नांना काही अंशी यशही येत आहे; परंतु कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी ती वाढत चालल्याने चिंतेचे ढग अधिकच गडद होऊ लागले आहेत.

सातारा जिल्ह्यात दि. १ ते १२ एप्रिल या कालावधीत तब्बल ८ हजार ८०० रुग्ण आढळून आले आहेत. तर ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केवळ १२ दिवसांत जवळपास नऊ हजार रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले असले तरी सद्यस्थितीत सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्‍यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होऊ लागली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता नागरिकांनी शासन नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.

(चौकट)

याची आहे गरज

१. सातारा पालिकेने गतवर्षी १४ कर्मचाऱ्यांचे एक अशी २२ पथके तयार केली होती.

२. या पथकांनी रोज नऊ ते दहा तास काम करून शहरातील २७ हजार ५०० कुटुंबांचा सर्व्हे केला होता

३. यामध्ये केवळ पुणे-मुंबई येथून आलेल्यांचीच नोंद नव्हती तर प्रत्येक कुटुंबाच्या प्रमुखासह, सदस्यांचा तपशील त्यांची वैद्यकीय माहिती, प्रवास, चालू असलेले उपचार त्याचा तपशील इत्यादी नोंदी घेण्यात आल्या होत्या.

४. सध्या कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा सर्व्हेचे काम हाती घेणे गरजेचे बनले आहे.

५. ज्या भागात, पेठेत रुग्ण संख्या अधिक आहे तेथे कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे.

६. नागरिकांनी देखील परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी शासन नियमांचे पालन करायला हवे.

(चौकट)

सातारा @ ५९१४

जिल्ह्यासह सातारा शहरातही कोरोनाने थैमान घातले आहे. पालिका प्रशासन व आरोग्य विभागाकडून गेल्या वीस दिवसांत सुमारे ६० हजार नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये तब्बल ५ हजार ९१४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालिकेच्या कोरोना विभागाकडून देण्यात आली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, विक्रेते, हातगाडीधारकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा शहरासह तालुक्यात बाधितांची संख्या वाढू लागली असून सातारा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागला आहे.

(चौकट)

शहरात ९२ प्रतिबंधित क्षेत्र

सातारा शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होऊ लागली आहे. सध्या शहर व परिसरात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ९२ इतकी झाली आहे. पालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्र बांबू व बॅरिकेटिंकद्वारे सील केली जात आहेत. या ठिकाणी निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात असून, पालिकेने या कामी विशेष पथक नेमले आहे.

(गेल्या बारा दिवसांतील कोरोना स्थिती)

दि. बाधित मृत्यू

१. ५३२ ४

२. ७४२ ०

३. ७०३ २

४. ४९८ ६

५. ७५८ ६

६. ५१५ ७

७. ९२२ ५

८. ६५९ ९

९. ७१६ ८

१०. ८८५ ११

११. ८५४ ७

१२. १०१६ १४

एकूण ८८०० ७९