शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक किल्ले वासोटा सर करण्यासाठी बालमावळ्यांचा उत्साह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 17:01 IST

fort satara Kids- ऐतिहासिक किल्ले वासोटा पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक व गिरीप्रेमी येतात. काही बालमावळ्यांचा उत्साहदेखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.  छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत साताऱ्यातील हेमर साळुंखे, कृपा साळुंखे, रुचा चव्हाण या चिमुकल्यांनी मोठया उत्साहात किल्ले वासोटा पुर्णपणे यशस्वीरित्या सर केला. त्याचे गिरीप्रेमींकडून विशेष कौतुक होत होते. 

ठळक मुद्देचिमुकल्याचे गिरीप्रेमींकडून कौतुक छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष

पेट्री/ सातारा :ऐतिहासिक किल्ले वासोटा पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक व गिरीप्रेमी येतात. काही बालमावळ्यांचा उत्साहदेखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.  छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत साताऱ्यातील हेमर साळुंखे, कृपा साळुंखे, रुचा चव्हाण या चिमुकल्यांनी मोठया उत्साहात किल्ले वासोटा पुर्णपणे यशस्वीरित्या सर केला. त्याचे गिरीप्रेमींकडून विशेष कौतुक होत होते. कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वासोटा हा वनदुर्ग. दुर्गप्रेमींचे ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण म्हणजे ऐतिहासिक किल्ले वासोटा. व्याघ्र प्रकल्प व बामणोली वन्यजीव वनक्षेत्रातील किल्ले वासोटा बफर व कोअर क्षेत्रात येते. साहसी ट्रेकची आवड असणारे अनेक दूर्गप्रेमींचे आकर्षण. वनखात्याच्या चेकपोस्टपासून पुढे खड्या चढाईने दोन तासांत किल्याच्या माथ्यावर पोहचता येते.

संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या संख्येने वासोटा ट्रेकींगसाठी येत आहेत. बामणोलीपासून साधारण एक- दीड तास बोटीने प्रवास करून मेट इंदवलीत येतात. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसाठी बांबुचे बॅरिगेट्स तसेच पर्यटक, गिरीप्रेमींची टेम्प्रेचर तपासणी तदनंतर पर्यावरणाचा समतोल तसेच वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रकारच्या प्लास्टिकची नोंद करून वनविभागाच्या परवानगीने दुर्गवारीस सुरुवात होते.

शनिवार, रविवारी बहुसंख्य पर्यटक ट्रेकिंगसाठी येताना पाहायला मिळतात. चोंहोबाजुला दाट हिरवीगार झाडी त्यात खडतर तसेच पुर्णतः चढ-उतार म्हणजे गिरीप्रेमींसाठी खास पर्वणीच. यामुळे ट्रेकिंगसाठी बहुतांशी पर्यटक या ठिकाणी येतात.छत्रपती शिवाजी महाराज की जय...,छत्रपती संभाजी महाराज की जय..., जय भवानी जय शिवाजी... अशा घोषणेमुळे आलेल्या उत्साहाच्या बळावर मोठया उत्साहाने वासोटा किल्ला सर केला. दीड-दोन तासांचा पायी प्रवास करत चिमुकल्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. खाचखळगे अन् दगडगोटे यशस्वीरित्या पारसाताऱ्यातील हेमर साळुंखे याअवघ्या पाच वर्षाच्या बालमावळ्याने कोणाच्याही मदतीशिवाय न दमता मोठया उत्साहाने खाचखळगे, घसरटे दगडगोटे असलेली दोन तास खडी चढाई व दीड तास तीव्र उतार यशस्वीरित्या पार करून पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या समवेत सात ते दहा वर्षाच्या तिघी चिमुरडीही होत्या.  प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचेदेखील गिरिप्रेमींकडून टाळ्या वाजवून विशेष कौतूक केले गेले.  

आत्तापर्यंत बहुतांशी गडकोट, किल्यांना भेटी दिल्या. परंतु हा ऐतिहासिक वासोटा किल्ला सर करणं म्हणजे मोठं आव्हान होतं. चढताना आमची दमछाक होत होती. परंतु या चिमुकल्या मावळयांचा उत्साह पाहून त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळत गेली.- महेंद्र साळुंके,गिरिप्रेमी मुंबई.

टॅग्स :FortगडSatara areaसातारा परिसर