शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

जादुई नगरीचा अलोट आनंद

By admin | Updated: September 3, 2016 01:04 IST

‘लोकमत बाल विकास मंच’चे आयोजन : जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या कार्यक्रमाला गर्दी

सातारा : जादुई दुनियेचे विलक्षण आकर्षण असलेल्या बच्चे कंपनीने रविवारी साताऱ्याच्या शाहू कला मंदिरमध्ये ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद देत सुंदर सफरीचा आनंद लुटला. जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या एकापेक्षा एक प्रयोगांनी थक्क होत बालमंच सदस्यांनी अक्षरश: जल्लोष केला.छोट्या दोस्तांनी रविवारची सुटी द्विगुणित करण्याची संधी ‘लोकमत’ बालविकास मंचने मुलांना दिली. जादूगार रघुवीर यांच्या ‘मॅजिक शो’ने लहान मुलांसह पालकांनाही काहीकाळ तणावाचे क्षण विसरायला लावले. एकसे बढकर एक जादूच्या विलक्षण प्रयोगांमुळे आणि त्यातील हकल्या-फुलक्या विनोदांच्या पेरणीमुळे हा कार्यक्रम बालमनांवर मोहिनी टाकून गेला.कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी सक्सेस अ‍ॅबॅकसचे संचालक किरण पाटील, देसाई मॅडम, अनंत ट्रेडिंग कंपनीचे प्रभा भोसले, जनार्दन भोसले, माउली सोफाजच्या अमर अग्रवाल, फायरफॉक्स बाईक स्टेशनच्या आशिष जेजुरीकर, टॉयलॅण्ड टॉय शॉपीचे गोपाळ मिनियार, हिरामोती किडस वेअरचे विजयेंद्र राठी, चकोर बेकरीचे सिद्धार्थ गुजर, एडिसन क्लबचे अनुपमा दीक्षित, दिनेश दीक्षित, सेंट पॉल्स स्कूलचे प्राचार्य धनराज पिल्लई, सूरज पवार, हिंदवी पब्लिक स्कूलच्या प्राचार्य कुलकर्णी मॅडम, लायन्स नॅब हॉस्पिटलच्या डॉ. दाभाडे, रुबी हॉल क्लिनिकचे मॅनेजर नीलेश बळी, सोनी कस्टम्स अँड वॉचेसचे रियाझ शेख, जादूगार जितेंद्र रघुवीर, आनंद कृषी पर्यटनचे आनंद शिंदे आदींची उपस्थिती होती. जादूगार रघुवीर यांनी रविवारी वेगवेगळ्या प्रयोगांनी छोट्या दोस्तांना अक्षरश: खिळवून ठेवले. यामध्ये झेंग-झॅगबॉय, भूतनी बॉक्स, डबर एक्स्चेंज मिस्ट्री, मिस्ट्रियस सिलिंडर फ्रॉम सिंगापूर, रुबिक्स, क्यूब गेम शो, मास्टर आॅफ पेडिशन, मागाल तो पदार्थ खायला मिळणार, मानेतून तलवार आरपार, हवेत उडणाऱ्या बॉक्समधून माणसाची निर्मिती, प्रेक्षकातील मुलगी संपूर्ण अधांतरी, जाड पत्र्यामधून माणूस आरपार असे जादूचे नानाविध प्रयोग सादर केले. (प्रतिनिधी) सक्सेस अ‍ॅबॅकसचे टेक्निक थक्क करण्यासारखेबालविकास मंचच्या ओळखपत्राचे प्रायोजकत्व स्वीकारलेले सक्सेस अ‍ॅबॅकसचे संचालक किरण पाटील यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला अ‍ॅबॅकसविषयी माहिती दिली. हे टेक्निक आत्मसात केल्यानंतर विद्यार्थी सर्व गणिती प्रक्रिया अत्यंत कमी वेळात व कुशलतेने सोडवतात. तसेच कोणत्याही २ अंकी संख्येचा पाढा वेगाने म्हणून दाखवितात. याचे प्रात्यक्षिकही सक्सेस अ‍ॅबॅकसच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. सक्सेस अ‍ॅबॅकसच्या विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या गणिती पाढ्यांच्या आकलनामुळे उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट होत होता.