शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाला अखेर मुहूर्त

By admin | Updated: April 15, 2017 12:45 IST

कामास प्रारंभ : सेवागिरी ट्रस्टच्या बांधिलकीचा अनोखा पायंडा

आॅनलाईन लोकमतपुसेगाव, जि. सातारा, दि. १५ : पुसेगाव, ता. खटाव येथील मुख्यबाजारपेठेतून जाणाऱ्या सातारा-पंढरपूर राज्यमार्गाच्या रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाचे काम अखंडपणे सुरु करण्याची ग्वाही बांधकाम विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. या राज्यमार्गावरील पुसेगाव अंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी ठरल्याप्रमाणे ग्रामस्थांतर्फे जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नारायणगिरी सभागृहात झालेल्या पुसेगाव ग्रामस्थ व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. दरम्यान बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहाचे काम बांधकाम विभागाच्या हद्दीत आमदार विकास निधीतून करण्याचा महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.ग्रामस्थांनी वारंवार मागणी केल्यानंतर मध्यंतरी रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला. परंतु बांधकाम विभागाने ते काम अर्धवट सोडल्याने व गटारांची सोय नसल्याने सेवागिरी मंदिर ते जुनी ग्रामपंचायत परिसरातील ग्रामस्थांनी सांडपाणी रस्त्यावर सोडल्याचे आमदार शिंदे यांनी बांधकाम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी रहदारीस अडथळा होणार नाही अशा रितीने किमान नऊ मिटर रुंदीचा रस्ता दोन्ही बाजूंच्या गटारांसह करण्यात यावा तसेच एकदा सुरु झालेले काम नॉनस्टॉप करण्यात यावे, अशी मागणी आमदार शिंदे व ग्रामस्थांनी बैठकीत केली.या रस्ता रुंदीकरणास प्रारंभ होईल. तसेच रस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध असलेल्या एक कोटी रुपयांच्या निधीतून हे काम सलगपणे करण्याची तसेच दुतर्फा गटारे काढून देण्याची ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. जर दबावामुळे अथवा अडथळ्यांमुळे काम बंद पडले तर त्यास संबंधीत अधिकारी जबाबदार राहतील व त्याविरुध्द ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस मठाधिपती सुंदरगिरी महाराज, पुणे येथील कार्यकारी अभियांता डी. व्ही. टिसोळकर, मुख्य अभियंता संभाजी माने, मुख्य कार्यकारी अधिकारी एल. एन. वाघमोडे, अभियंता जावळकोटी, अभियंता सुनिलकुमार, वडूज विभागाचे अभियंता संभाजी जाधव, सेवागिरी ट्रस्टचे विश्वस्त सुरेशशेठ जाधव, माजी उपसरपंच बाळासाहेब जाधव, सुनिल जाधव,जगनशेठ जाधव,अशोकराव जाधव, रामभाऊ जाधव, गणेश जाधव, मनोज जाधव, राजू गाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्वच्छतागृहांसाठी १० लाखांचा निधीगेल्या काही महिन्यांपुर्वी येथील बसस्थानक परिसरात असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह पाडण्यात आल्याने येथील ग्रामस्थ व प्रवाशांची मोठी गैरसोय सुरु आहे. या स्वच्छतागृहासाठी बांधकाम विभागाच्या हद्दीत जागा उपलब्ध झाल्याने आमदार शिंदे यांनी दहा लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला असून लवकरच हे कामही मार्गी लागणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.