शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सभासदांना नाडणारा सहकारी कावेबाजपणा संपवा

By admin | Updated: March 25, 2016 00:02 IST

उदयनराजे भोसले : सहकारमंत्र्यांना निवेदन; कारखाना-सूतगिरणी-बॅँॅँकांमधील गळचेपीबद्दलही भाष्य

सातारा : सहकार क्षेत्रातील व विशेषत: सहकारी साखर कारखाने व अन्य सहकारी संस्था, उपविधींच्या आडून करीत असलेल्या सभासदांच्या गळचेपीबद्दल सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना खासदार उदयनराजे भोसले यांनी निवेदन दिले. कोणत्याही सभासदास, सभासद आहे या एकमेव अटींवर निवडणूक लढवण्याची मुभा असणारा बदल घडवावा, तसेच सभासदत्व मिळविण्यामध्येही शेतकरी आहे आणि सभासदत्व घेण्याची इच्छा आहे याच अटींवर सभासदत्व देण्यात यावे, याकरिता योग्य ती कार्यवाही करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे मूळ सहकार तत्त्वांना हरताळ फासून, प्रसंगी सहकार कायद्यात बदल करून आणि पतसंस्था, बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या आदी संस्था नोंदणी करताना करण्यात आलेल्या संस्था घटनेच्या उपविधीमध्ये बदल करण्यात आला. आपल्या स्वार्थासाठी पाहिजे, तसा सहकार वाकवण्याचा पायंडा पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रकर्षाने पाहायला मिळत आहे. निवडणुकीला उभे राहण्यासाठी सहकारी संस्थेच्या घटनेत अशा काही तरतुदी करायच्या आणि संभाव्य विरोधकाला निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी अपात्र ठरवायचे असे प्रकार सर्रास होत आहेत. वास्तविक प्रत्येकाच्या एका हाताची पाच बोटे कधीच दुसऱ्यासारखी नसतात; मग शेकडो, हजारो सभासद एका विचाराचे कैक वर्षे असू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु उपविधीमध्ये केलेले सोयीचे बदल, निवडणुकीसाठी पात्रता ठरवण्याचे निकष आदी तरतुदींचा लाभ उठवत, विरोधकांना निवडणुकीत सहभागीच होऊ द्यायचे नाही, असा कावेबाजपणा सहकारात रुजलेला आहे. संस्था अधिनियमात निवडणुकीला जो सभासद आहे. त्याला निवडणूक लढवण्यास कोणतीही बाधा येणार नाही, अशी तरतूद सर्वच सहकारी संस्थांना लागू करण्याबाबत योग्य तो बदल करण्यात यावा. सभासदत्व मिळण्यातसुद्धा जाचक अटी नसाव्यात फक्त शेतकरी आहे का आणि त्याची सभासद होण्याची इच्छा आहे का, या अटींवर त्यास सभासद करून घ्यावे. यामध्ये कोणताही भेद सभासदांमध्ये करण्यात येऊ नये. तसेच हा नियम सहकारी बँका, कारखाने, साखर कारखाने, सूतगिरण्या आदी कोणत्याही सहकारी संस्था असतील त्या सर्वांना लागू करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)