शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
2
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
3
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
4
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
5
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
6
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
7
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
8
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
9
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
10
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
12
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
13
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
14
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
15
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
16
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
17
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
18
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
19
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
20
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी

भांडेवाडीचं अतिक्रमण विधानसभेत गाजलं

By admin | Updated: October 12, 2015 00:30 IST

राजकीय दबाव : गायरानात बांधलेले घर पाडण्यासाठी चक्क तीन आमदारांनी लावली प्रतिष्ठा पणाला

खटाव : अतिक्रमणाचा विषय म्हटलं तर स्थानिक पातळीवरही काही मिनिटांत निकाली काढण्यासारखा; पण भांडेवाडीतील गायरानावरील अतिक्रमण भलतंच गाजलं. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह तीन आमदारांनी विधानसभेत हा विषय अतारांकित बनविला आहे. दरम्यान, ‘अतिक्रमणाच्या नावाखाली शेतकऱ्यावर राजकीय आकसातून अन्याय केला जात आहे,’ असा आरोप वयोवृद्ध शेतकरी जयराम फडतरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.राज्यभर खळबळ निर्माण करणाऱ्या घटनेची माहिती अशी की, भांडेवाडी येथे गायरान जमिनीवर घर बांधून अतिक्रमण केल्याबद्दलजयराम गणू फडतरे यांना घर पाडण्याचा शासनाचा आदेश आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांचा मुलगा राजेंद्र फडतरे यांचे घर पाडण्यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाचा आदेश एकाच्या नावे आणि पाडण्याची प्रकिया दुसरीकडे असे चित्र निर्माण झाले आहे. जयराम फडतरे यांनी ‘माझ्या नावे आदेश असल्यामुळे माझे घर पाडले तरी माझी कोणतीच हरकत नाही,’ असे यापूर्वीही सांगितले आहे. परंतु त्यांच्या मुलाच्या नावाने कोणताच आदेश किंवा नोटीस नसताना त्याचे घर पाडण्यासंबंधीच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत.’ वास्तविक पाहता शासनाच्या गायरानावर केवळ जयराम फडतरे यांचे घर नसून अन्य ३३ जणांनी या जागेवर अतिक्रमण केले आहे. मग एकट्या जयराम गणू फडतरे यांनाच का वेठीस धरले जात आहे. हाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. विधानसभेत आमदार शशिकांत शिंदे, मोहोळचे आमदार रूपेश कदम, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत भांडेवाडीमधील गट नं ४०९ मध्ये रस्त्यावर अतिक्रमण झाल्याबाबत ‘अ’ तारांकित प्रश्नसातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भांडेवाडी येथील गट क्रमांक ४०९ मध्ये अतिक्रमण झाले आहे. येथे अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आले असल्यामुळे येथील रस्ता बंद झाला आहे. या रस्त्यामध्ये झालेले अतिक्रमण काढण्यासाठी खटाव (वडूज)चे तहसीलदारांनी गट विकास अधिकाऱ्यांना १८ सप्टेंबर २०१४ रोजी पत्राद्वारे कळविले आहे. अतिक्रमण केलेले असल्यास गट विकास अधिकाऱ्यांनी ते काढलेले नसल्यास त्याची कारणे काय आहेत.अतिक्रमण काढण्यासाठी कोणती उपाययोजना केली. या संदर्भात अतारांकित प्रश्न विधानसभेत मांडण्यात आल्यानंतर तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत फडतरवाडी यांचे मार्फत जयराम फडतरे यांच्या नावे आदेश काढून त्यांना दिला. प्रशासनाचा आदेश एकाचे नावे घर पाडण्याच्या हालचाली दुसऱ्याचे अशा हालचाली वेग धरू लागल्या आहेत. (वार्ताहर)३२ अतिक्रमणे सोडून फडतरेच ‘टार्गेट’गायरानावर अतिक्रमण झाले असल्याचे सांगत माझे घर पाडण्याचा आदेश ग्रामपंचायतीने दिला आहे. मी घर पाडण्यास तयार आहे. माझ्या नावाचा आदेश असताना याच गट क्रमांकात माझ्या मुलाच्या नावे असणारे घर पाडण्याचा घाट का घातला जात आहे. माझ्याबरोबर इतर ३३ लोकांचे त्याच गायरानावर अतिक्रमण असताना त्यांना कोणतीच नोटीस नाही. परंतु, मला मात्र आदेश काढून घर पाडण्यासंदर्भात दबाव आणला जात आहे. मोजणीत १७० उंबरे अतिक्रमणात येत आहेत. त्यांच्यावर काय कार्यवाही करणार आहेत. अतिक्रमणात येणाऱ्या सर्वांना वगळून फक्त माझ्याच नावाने विधानसभेत तारांकित प्रश्न कसा विचारला गेला. हा तर सरासर अन्याय आहे. आमच्या कुटुंबावर अन्याय झाला तर मी आत्मदहन करणार आहे, असा इशाराही शेतकरी जयराम फडतरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घर पाडण्यासाठी हालचालीफटतरे यांच्यावर दबावतंत्राचा वापर करून घर पाडण्याचा घाट केला जात आहे. ग्रामपंचायत भांडेवाडीकडे ग्रामपंचायत अधिनियम कलम ५३ अन्वये अतिक्रमण काढण्याचे व अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवण्याचे सर्व अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. तरीही ठोस कारवाई केली जात नसल्याच्या लेखी पत्रामुळे ग्रामपंचायतीतर्फे घर पाडण्याच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे.