शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानातल्या स्वच्छतेने कर्मचाऱ्यांची पहाट, कऱ्हाड स्वच्छता मोहीम : तीन ट्रॉली कचरा केला गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:41 IST

संतोष गुरव ।कऱ्हाड : दररोजची पहाट ही प्रत्येकाला सुंदर दृश्याने सुरू व्हावी, अशी वाटत असते. ती जर स्मशानातील दृश्याने झाली तर अशीच कºहाड पालिकेच्या कर्मचाºयांची पहाट सोमवारी येथील पालिकेच्या स्मशानभूमी परिसरातील स्वच्छतेने झाली. त्यांनी चार तासांत स्मशानभूमी परिसरासह नदीकाठचीही स्वच्छता केली.कधी कृष्णानदी काठची स्वच्छता तर कधी मनात आलं तर मैलोनमैल ...

ठळक मुद्देपालिकेच्या वीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्मशानभूमी परिसर झाला ‘निर्मळ’

संतोष गुरव ।कऱ्हाड : दररोजची पहाट ही प्रत्येकाला सुंदर दृश्याने सुरू व्हावी, अशी वाटत असते. ती जर स्मशानातील दृश्याने झाली तर अशीच कºहाड पालिकेच्या कर्मचाºयांची पहाट सोमवारी येथील पालिकेच्या स्मशानभूमी परिसरातील स्वच्छतेने झाली. त्यांनी चार तासांत स्मशानभूमी परिसरासह नदीकाठचीही स्वच्छता केली.कधी कृष्णानदी काठची स्वच्छता तर कधी मनात आलं तर मैलोनमैल जाऊन रायगडाची स्वच्छता. हे करू जाणं फक्त कºहाडकरांनीच. त्यांच्या मनात आलं तर ते काहीही करू शकतात. मग आपण कोणत्या ठिकाणी स्वच्छता करतोय, याच भानही त्यांना राहत नाही. रायगडावर स्वच्छता मोहीम फत्ते पाडल्यानंतर स्वगृही परतलेल्या कºहाड पालिकेच्या मुख्याधिकाºयांसह वीस कर्मचाºयांनी सोमवारी येथील स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. आणि चार तासांच्या या स्वच्छतेतून तब्बल तीन ट्रॉली भरेल इतका कचरा गोळा केला.ज्या ठिकाणी दिवसा येण्यास प्रत्येकाची पावलं धजावत असतात. भीती वाटत असते, अशा ठिकाणी स्मशानभूमी परिसरात पहाटे स्वच्छता करणे कोणाला आवडेल? असा प्रश्न कोणाला विचारल्यास उत्तर मिळेल नाही; पण हे कºहाड पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचाºयांनी करून दाखवले. कर्मचाºयांनी येथील स्मशानभूमी परिसरात सोमवारी सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्याबरोबर नगरसेवक प्रीतम यादव व पालिकेच्या कर्मचाºयांनी जी स्वच्छता केली. त्यानंतर हा भयावह दिसणारा परिसर सुंदर व स्वच्छ दिसू लागला आहे.कुठे अर्धवट जळालेले बांबूतर कुठे फुटलेली मडकीस्मशानभूमी परिसरात सोमवारी कर्मचारीस्वच्छतेसाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणीकुठे अर्धवट जळालेले बांबू तर कुठे फुटलेलीमडकी आढळून आली. तसेच प्लास्टिकपिशव्या, सुकलेला पालापोचाळा, हार-तुरे,अगरबत्ती, काळेकुट्ट पडेलेले दगड दिसले. तेही कर्मचाºयांनी उचलून ट्रॉलीत टाकून बारा डबरी परिसरात नेले.कुणाच्या हातात फावडे तर कुणाच्या पोतेकºहाड पालिकेच्या कर्मचाºयांनी स्मशानभूमी स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेत टिकाव, खोरे, फावडे तसेच पोते आदी साहित्यांसह तीन ट्रॉली असा लवाजमा सोबत घेतला. स्मशानभूमी परिसरात सकाळी ठीक सात वाजता पोहोचल्यानंतर कुणी हातात फावडे घेतले तर कुणी पोते घेतले. तसेच कचरा गोळा केला.उपक्रमांची यशस्वी अंमलबाजवणीकºहाड पालिकेचे मुख्याधिकारी डांगे यांनी शहरात विविध उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. स्वच्छ वॉर्ड स्पर्धा, शौचालयावर डिजिटल यंत्रांद्वारे तक्रारीची दखल, उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापन स्पर्धा, सोळा हजार बकेटचे वाटप, प्लास्टिक पिशव्या वापराबाबत कारवाई मोहीम असे विविध उपक्रम राबविले. सध्या त्यांच्याकडून नदीकाठ परिसरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.