शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

मलकापूरात आपत्ती व्यवस्थापन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 17:07 IST

मलकापूर (जि. सातरा) येथील नगरपंचायतीने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जलद कृती आराखडा तयार केला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली असून सर्व विभागातील कर्मचाºयांच्या ठराविक तुकड्या व आपत्कालीन साहित्यासह स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवले आहे. 

ठळक मुद्देआपत्तीवर मात करण्यासाठी जलद कृती आराखडानगरपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांचा समावेशसमितीअंतर्गत सात विभाग

मलकापूर (जि. सातरा) 27 : येथील नगरपंचायतीने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जलद कृती आराखडा तयार केला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली असून सर्व विभागातील कर्मचाºयांच्या ठराविक तुकड्या व आपत्कालीन साहित्यासह स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवले आहे. 

मलकापूर शहर हे आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी वसालेले शहर आहे. केवळ दहा वर्षात लोकसंख्या झपाट्याने वाढून ३२ हजारावर गेली आहे.  सर्व पातळीवर शहराची प्रगती होत असताना तेवढ्याच झपाट्याने शहरातील स्थानिक प्रशासनाच्या जबाबदाºयाही वाढल्या आहेत.

शहराच्या दक्षिण-पश्चिम भागात आगाशिवचा डोंगर तर उत्तरेकडील भागात कोयना व कृष्णा नदी वाहत आहे. तर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ गेल्यामुळे शहराची ९ चौरस किलोमीटरमधे नागरी वस्ती पसरली आहे. सतरा लोकनियुक्त नगरसेकांसह दोन स्विकृत नगरसेवक असे चार प्रभागात एकूण १९ लोकप्रतिनीधी कार्यरत आहेत. मुख्याधिकारी यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी शहराची सर्वांगिण  जबाबदारी सांभाळत आहेत. 

शहराची भौगोलिक परिस्थिती व शासनाच्या नियमानुसार शहरासाठी आपत्कालीन व्यवस्थापन असणे बंधनकारक असाते. मलकापूर शहराला आजपर्यंत  पूर परिस्थितीचा कधीच सामना करावा लागला नाही. मात्र शहरालगत असणाºया कºहाड शहरासह कापील, गोळेश्वर, आटके या नदीकाठच्या गावांमधील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवणे व आगाशिव डोंगर उतारावरून वाहणाºया पाण्याचा योग्य निचरा करून देण्यासाठी तसेच इतर नैसर्गिक आपत्कालीन काळात सहकार्य करण्यासाठी मलकापूरचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

आपत्कालीन काळात तातडीने संपर्क करण्यासाठी नगरपंचायतीचा टोल फ्री नंबर व सर्व कार्यालयीन फोन नंबर जाहीर केले आहेत.  याशिवाय  नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांसह ९ विभागातील ३९ कर्मचाºयांच्या मोबाईल नंबरचा समावेश करण्यात आला आहे.

याबरोबरच कºहाड येथील १४ सरकारी व निमसरकारी कार्यालयांचे व अधिकाºयांचे दूरध्वनी क्रमांक, अत्यावश्यक सेवा, चौकशीसाठी पोलीस ठाणे, विविध अग्निशामक केद्र, रूग्नालये, रूग्णवाहीका, महावितरण कार्यालय, दुर संचार अशा अत्यावश्यक सेवांच्या फोन नंबरचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पूर परिस्थितीत मदत करण्यासाठी पोहणाºया दहा व्यक्तींची यादी व फोन नंबर समाविष्ट करण्यात आले आहेत. समितीअंतर्गत सात विभागनगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी मिळून एक ९ सदस्यांची आपत्ती व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत सर्व ८ विभागाच्या विभागप्रमूखांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यालयप्रमुख व पूर नियंत्रक म्हणून मुख्याधिकारी संजीवनी दळवी या काम पहात आहेत. या समितीअंतर्गत सात विभाग तयार करण्यात आले आहेत.