शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

टंचाईच्या काळात उधळपट्टी!

By admin | Updated: November 13, 2015 23:43 IST

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : पाईपलाईनला गळती; अंधाऱ्या रात्री हजारो लिटर पाणी वाया

शाहूपुरी : येथील शिवाजी नगर कॉलनी परिसरात प्राधिकरणाच्या पाईपलाईनला गळती लागली असून, अंधाऱ्या रात्रीत दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.एकीकडे जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळग्रस्त पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. तर शाहूपुरी परिसरात गेले अनेक महिन्यांपासून प्राधिकरणाच्या अनेक पाईपलाईनला शिवाजीनगर, समतापार्क, जवाहर कॉलनी येथे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गळती लागल्यामुळे हा परिसर चिखलमय झाला असून, पाय घसरत असल्याने तेथून चालणेही धोकादायक बनले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हीच परिस्थिती असूनही याकडे प्राधिकरण दुर्लक्ष करीत आहे. सध्या पावसाने मारलेली दडी चिंताग्रस्त असून, पाण्याचे साठे खालावत चालले आहेत. अशा परिस्थितीत हजारो लिटर पाण्याची नासाडी न परवडणारी आहे. वारंवार असे प्रकार घडत असूनही याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. गळती लागल्यामुळे वाहनचालक व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. घाणीतूनच विद्यार्थ्यांना व नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. गळती लागल्यामुळे हे पाणी रस्त्याच्या उताराने जात आहे. याठिकाणी तीव्र उतार असल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी करसत करावी लागत आहे. वाहने घसरण्याचे प्रमाणही वाढतच चालले आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने वेळेतच लक्ष घालून येथील पाईपलाईनची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पाणी बचतीचे महत्त्व प्राधिकरणला कधी कळणार, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (वार्ताहर)पाणीटंचाई यंदा लवकरच!या वर्षी राज्यात सर्वत्र अपुरा पाऊस पडला आहे. जिल्ह्यात तर परतीचा पाऊसही म्हणावातसा पडला नाही. दर वर्षी जाणवणारा पाणीटंचाई या वर्षी जानेवारीपासूनच जाणवू लागेल, अशी चिन्हे आहेत. सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर पाणी जपून वापरण्याचा सल्ला नागरिकांना वारंवार दिला जात आहे. यापार्श्वभूमीवर गळती रोखणे हे संबंधित यंत्रणांचे कर्तव्य ठरते. मात्र, सातारा शहर आणि उपनगरांत अनेक ठिकाणी पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर सुरू असून ही एकप्रकारे पाण्याची उधळपट्टीच ठरते.