शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
5
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
6
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
7
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
8
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
10
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
11
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न
12
आयेशा खानने मारला मोदक अन् पुरणपोळीवर ताव, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
13
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
14
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
15
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
17
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
18
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
19
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू

डोंगरावरच्या रानभाज्यांची मुंबईकरांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:00 IST

लक्ष्मण गोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबामणोली : बामणोली व तापोळ्याच्या डोंगररांगांमध्ये उगवलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या ग्रामस्थांना खुणावू लागल्या आहेत. औषधी अन् दुर्मीळ असलेल्या या रानभाज्यांची शेतकऱ्यांकडून देवाण-घेवाण सुरू झाली असून, या भाज्यांचे महत्त्व जाणणारे मुंबई येथील रहिवाशांकडून या भाज्यांना मागणी वाढू लागली आहे.कास, बामणोली, तापोळा हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. घनदाट ...

लक्ष्मण गोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबामणोली : बामणोली व तापोळ्याच्या डोंगररांगांमध्ये उगवलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या ग्रामस्थांना खुणावू लागल्या आहेत. औषधी अन् दुर्मीळ असलेल्या या रानभाज्यांची शेतकऱ्यांकडून देवाण-घेवाण सुरू झाली असून, या भाज्यांचे महत्त्व जाणणारे मुंबई येथील रहिवाशांकडून या भाज्यांना मागणी वाढू लागली आहे.कास, बामणोली, तापोळा हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. घनदाट जंगलांची व्यापलेल्या येथील डोंगररांगांमध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती आजही आढळून येतात. या वनस्पतींबरोबरच केवळ पावसाळ्यात उगवणाºया रानभाज्याही अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात. या भाज्या दुर्मीळ, औषधी अन् पौष्टिक असल्याने पावसाळ्यात या भाज्यांचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश केला जातो. पावसाळा नुकतान सुरू झाला असून, विविध प्रकारच्या रानभाज्या डोंगरांगांमध्ये उगवू लागल्या आहेत.यामध्ये प्रामुख्याने शेंडवल, वाघचौडा, सक्रोबा (भारंगी) रानअळू, फरसुंगी, काटवेल, टाकळा, मासाळ या रानभाज्या डोंगरात उगवल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थ या भाज्यांचा आहारात समावेश करू लागले आहेत. या भाज्यांचे महत्त्व जाणणारे ग्रामस्थ एकमेकांना व नातेवाइकांना या भाज्यांची देवाणघेवाण करू लागले आहे. एवढेच नव्हे तर मुंबई व सातारा येथे राहणाºया नागरिकांकडूनही या भाज्या खाण्यासाठी मागविल्या जात आहेत. स्थानिक शेतकºयांकडून या भाज्यांची बाजारपेठत विक्री केली जात आहे. भाज्यांबरोबर रान अळंबी व भोपीडही उगवू लागली आहे. रान अळंबीची भाजी तसेच आमटीही केली जाते.आरोग्याला लाभदायक...या रानभाज्यांपैकी अनेक भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. यापैकी सक्रोबा भारंगी ही भाजी पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयोगी आहे.रान अळू ही रक्तवाढीसाठी तसेच कुरडू ही भाजी मूळव्याधीवर बहुगुणी मानली जाते. या भाज्या म्हणजे आजीबाईचा बटवा समजल्या जातात.रानभाज्या आरोग्याला लाभदायक असल्याने घरातील वयस्कर मंडळी तरुण पिढीला या भाज्या खाण्यासाठी आग्रह करत असतात.