शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सोडल्याचा दाखला देण्यातील संभ्रम दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

दहावी परीक्षा उत्तीर्णचा शेरा : मुख्याध्यापकांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दहावीची परीक्षा झाली नसल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ...

दहावी परीक्षा उत्तीर्णचा शेरा : मुख्याध्यापकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : दहावीची परीक्षा झाली नसल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कोणती तारीख आणि शेरा नोंद करायचा, याबाबत माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश मुख्याध्यापकांनी दहावी परीक्षा उत्तीर्णचा शेरा नोंदवून दाखला देत आहेत.

गेल्या आठवड्यात दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. त्यानंतर अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निकमधील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आदी कागदपत्रे मिळविण्याची पालक, विद्यार्थ्यांकडून प्रक्रिया सुरू झाली. मात्र, दहावीची अंतिम लेखी परीक्षा झाली नसल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कोणती तारीख, शेरा नोंदविण्याबाबतची अडचण मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाली. शासनाकडूनही त्याबाबत कोणत्याही सूचना नव्हत्या. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तारीख, शेरा नोंदविण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा मुख्याध्यापक संघाने मुख्याध्यापकांना गेल्या चार दिवसांपूर्वी दिल्या आहेत. त्यानुसार मुख्याध्यापकांकडून कार्यवाही सुरू आहे.

पॉइंटर

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा : ८२६

दहावीतील नोंदणी झालेले विद्यार्थी : ४०१६६

मूल्यांकन प्राप्त विद्यार्थी : ४०१६५

उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : ४०१३४

मुख्याध्यापक काय म्हणतात?

दि. ३१ मे २०२१ अशी शाळा सोडल्याची तारीख, पुढील वर्ग नसल्याने असा शेरा नोंद करून विद्यार्थ्यांना दाखला देण्यात येत आहे.

- मिथिला गुजर, मुख्याध्यापक

मागणीनुसार दाखला दिला, पुढील वर्ग नसल्याने अशी कारणांची नोंद करून शाळा सोडल्याच्या दाखल्याचे वितरण केले जात आहे.

- अमित कुलकर्णी, हिंदवी स्कूल

पालक म्हणतात

माझी मुलगी खाजगी हायस्कूलमध्ये दहावी उत्तीर्ण झाली. पुढील शिक्षणासाठी तिचा तेथील ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला जाणार आहे. त्यामुळे दाखला घ्यावा लागणार नाही.

- तुषार पाटील, करंजे

माझा मुलगा दहावी उत्तीर्ण झाला आहे. अजून त्याच्या पुढील प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी केलेली नाही. शाळेतून दाखला मिळविण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

- पल्लवी जाधव, मंगळवार पेठ

एकच शेऱ्याबाबत सूचना

शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांसमवेत मुख्याध्यापक महामंडळाच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनुसार प्रत्यक्ष निकाल पत्रक वेगळे असणार आहे. त्यामुळे शाळांना दाखल्यावर एकसारखा शेरा, तारीख नोंदविण्याबाबत मुख्याध्यापकांना मार्गदर्शक सूचना केली असल्याची माहिती गुरुकुल स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी सांगितले.

पॉइंटर

शाळा सोडल्याचा दाखल्यातील नोंदी

शाळा सोडल्याचे कारण : मागणीनुसार दाखला दिला, पुढील वर्ग नसल्याने, शिक्षणासाठी अन्यत्र गेला यापैकी एक

शेरा : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये एस. एस. सी. (इयत्ता दहावी) परीक्षा उत्तीर्ण.

शाळा सोडल्याची तारीख : दि. ३१ मे २०२१