शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अकरा डॉक्टर्स ठोकणार कायमचा रामराम..! सातारा जिल्हा रुग्णालयातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 20:49 IST

दत्ता यादव ।सातारा : खासगी पॅ्रक्टीससाठी केलेली मनाई, कामाचा जादा ताण अन् पदोन्नतीवर होत असलेला अन्याय यासह विविध कारणांमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील तब्बल ११ डॉक्टर येत्या काही महिन्यांत सिव्हिलला कायमचा रामराम ठोकण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी काहीजण सेवानिवृत्त तर काहीजणांची बदली कर काही डॉक्टर स्वत:हून राजीनामा देणार आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयात अगोदरच ...

ठळक मुद्देपदोन्नतीवर अन्याय अन् जादा काम

दत्ता यादव ।सातारा : खासगी पॅ्रक्टीससाठी केलेली मनाई, कामाचा जादा ताण अन् पदोन्नतीवर होत असलेला अन्याय यासह विविध कारणांमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील तब्बल ११ डॉक्टर येत्या काही महिन्यांत सिव्हिलला कायमचा रामराम ठोकण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी काहीजण सेवानिवृत्त तर काहीजणांची बदली कर काही डॉक्टर स्वत:हून राजीनामा देणार आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयात अगोदरच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अपुरे मनुष्यबळ असताना या अकरा डॉक्टरांनी भविष्यात सिव्हिलमध्ये नोकरी न करण्याचा निर्णय घेतल्याने आरोग्य यंत्रणा अक्षरश: कोलमडून पडणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या ३० डॉक्टर कार्यरत आहेत. यापैकी आता अकरा डॉक्टरांनी सोडून जाण्याचा निर्णय घेतला तर केवळ १९ डॉक्टरांवर सिव्हिलची मदार असणार आहे. या ११ पैकी ७ वैद्यकीय अधिकारी येत्या चार दिवसांत सिव्हिलला रामराम ठोकणार आहेत. त्यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ किरण जाधव यांनी तीन महिन्यांपूर्वीच राजीनामा देणार, अशी नोटीस दिली होती. त्यामुळे त्यांनी एक जूनपासूनच सिव्हिलमध्ये येणे बंद केले आहे. तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अभिजित घोरपडे यांनीही स्वत:हून राजीनामा दिला आहे. बालरोगतज्ज्ञ उल्का झेंडे याही येत्या काही दिवसांत सिव्हिल सोडण्याच्या मार्गावर आहेत.

नेत्ररोग तज्ज्ञ एन. डी. खोत हे येत्या ३० जूनला सेवानिवृत्त होणार आहेत. भूलतज्ज्ञ डॉ. सूर्यकांत बाबर आणि स्त्रीरोगतज्ज्ञ युवराज कर्पे यांची जिल्'ाबाहेर पदोन्नतीवर बदली झाली आहे. शरीरविकृतीतज्ज्ञ डॉ. छोले यांचीही इचलकरंजी येथे बदली झाली आहे.

उर्वरित राहिलेल्या चार डॉक्टरांना सेवा ज्येष्ठेतेनुसार पदोन्नती मिळाली नाही. शासनाने नुकतेच ५८ वरून ६० सेवानिवृत्तीची वयोमर्यादा केल्यामुळे ज्या डॉक्टरांना पदोन्नती मिळणार होती. ते डॉक्टर नाराज झाले आहेत. वर्षानुवर्षे रुग्णांना सेवा देऊन जर वेळेत पदोन्नती मिळत नसेल तर सेवेत कशासाठी राहायचे, असा प्रश्न संबंधित डॉक्टर उपस्थित करत आहेत.

सिव्हिलमधील जे चार डॉक्टर येत्या काही महिन्यांत स्वेच्छानिवृत्ती घेणार आहेत. त्यांची वीस वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. त्यामुळे हे डॉक्टर सेवानिृत्तीनंतर मिळणाºया लाभाला पात्र झाले आहेत. त्यांना सर्व लाभ मिळणार असल्यामुळे आता यापुढे सेवा करून काय उपयोग. वाढता कामाचा ताण आणि शासनाकडून वारंवार पदोन्नतीला मिळत असलेल्या हुलकावणीमुळे आम्ही अक्षरश: वैतागलो असल्याचे संबंधित चार डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यातच शासनाकडून खासगी प्रॅक्टीस करण्यास मनाई केल्यामुळे सिव्हिलमध्ये सेवा बजावण्यास अनेकजण नाउत्सुक आहेत. महिन्याला ८० ते ९० हजार पगार घेण्यापेक्षा बाहेर स्वत:ची खासगी प्रॅक्टीस केल्यास महिन्याला दीड ते दोन लाख मिळतात. त्यामुळे हे चित्र आहे.९० हजार पगार देऊनही कोणी येईना...जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या क्लासवनचे एक आणि क्लासटूची चार अशी पाच पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी अनेकदा जाहिरातीही देण्यात आल्या. मात्र, एकाही वैद्यकीय अधिकाºयाने सिव्हिलमधील रिक्त पदासाठी अर्ज केला नसल्याचे पुढे आले आहे. म्हणे याची कारणे अनेक आहेत. सिव्हिलमध्ये महिन्याकाठी ९० हजार पगार मिळत असला तरी खासगी प्रॅक्टीस केल्यास याच डॉक्टरांना दीड ते दोन लाख रुपये मिळतात. याशिवाय जर सिव्हिलमध्ये नोकरी केली तर जादा काम अन् ताण आणि विविध नेते, संघटनांकडून होणारा त्रास, यामुळे नोकरी करण्यास डॉक्टर इच्छुक नाहीत.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटल