शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘हत्ती’ मारणार आजपासून धडका!

By admin | Updated: August 2, 2016 00:59 IST

अतिवृष्टीची शक्यता : आश्लेषा नक्षत्रास मंगळवारपासून प्रारंभ

सातारा : पुष्य नक्षत्रातील पावसानं सातारा जिल्ह्यातील नागरिकांना खरोखर म्हाताऱ्यासारखंच रूप दाखवलं. पंधरा दिवसांत फारसा पाऊस झालाच नाही. शेवट-शेवट अधूनमधून सरी कोसळत होत्या. या पावसानं सर्वांनाच आभाळाकडे बघायला लावलं होतं. परंतु मंगळवार, दि. २ पासून आश्लेषा नक्षत्र सुरू होत आहे. त्याचे वाहन हत्ती असून, नक्षत्राला सुरुवात होण्यापूर्वीच धडका मारायला हत्तीनं सुरुवातही केली आहे. यंदा पर्जन्यमान चांगले असणार आहे. पावसाला वेळेतच सुरुवात होईल आणि नियमित पर्जन्यमानापेक्षा १०४ ते ११५ टक्के अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने व पर्जन्यविषयक काम करणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला होता. त्यामुळे सर्वांनाच हायसे झाले होते. सहा महिन्यांपासून पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागत असलेल्या ग्रामस्थांनी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पडलेल्या पावसामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला होता. आर्द्रा नक्षत्राला दि. २१ जूनला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन उंदीर होते. सुरुवातीचा पाऊस पश्चिम भाग असलेल्या सातारा, वाई, जावळी, महाबळेश्वर, पाटण तालुक्यांत चांगला पडतो; पण उंदराने शेतकऱ्यांना दगा दिलाच. कोठेही पावसाचा जोर नसल्याने ओढे, नाले, नदी कोरडेच होते. आजही अनेक भागांतील कूपनलिका कोरड्या आहेत. त्यामुळे पाण्याचे संकट आहे. पुनर्वसूचे वाहन असलेल्या कोल्ह्याने अपेक्षेप्रमाणे धुमाकूळ घातला; पण पुष्य नक्षत्राने दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सूर्य मंगळवार, दि. २ रोजी रात्री ९ वाजून १ मिनिटांनी आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्याचे वाहन हत्ती आहे. हत्ती धडका देईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांतील काही भाग वगळता उर्वरित जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारपासून तर पावसाचा जोर वाढला असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (प्रतिनिधी)दोन दिवस अतिवृष्टीमध्य महाराष्ट्रात दि.२ ते ४ आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या कालावधीत सुमारे ७० मिलिमीटरच्या आसपास पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याचाही मध्य महाराष्ट्रात समावेश होत असल्याने सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील हजारो नागरिकांना एसएमएस पाठवून सावधानतेचा इशारा दिला आहे.कोयनेची मदार ‘आश्लेषा’वरजून, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर हे पावसाचे महिने. त्यातील जून, जुलै महिना संपला तरी कोयना धरणात केवळ ६० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आश्लेषाचा चांगला पाऊस झाला तर लवकरच धरण भरू शकते. त्यामुळे धरणाची मदार आश्लेषा नक्षत्रावर आहे.सावधानतेचा इशाराया नक्षत्रात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली जात असून, काही ठिकाणी नुकसानकारक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता पंचांगकर्त्यांनी वर्तविली आहे. त्यांच्या मते २, ३, ४, ६, ७, १०, १२, १३, १४, १५ आॅगस्ट रोजी चांगला पाऊस होतो.