शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘वीज’ कडाडताच ‘वीज’ होते गायब... !

By admin | Updated: June 6, 2016 00:41 IST

चौथ्या दिवशीही पाऊस : दहिवडीला ६० मिमीची नोंद; झाडे पडल्याने वाहतूक ठप्प, हिंगणगावला जनरेटरद्वारे पाणीपुरवठा

सातारा : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस होत आहे. शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. त्यामुळे नुकसान होण्याबरोबरच वाहतूकही ठप्प होण्याची घटना घडली. फलटण तालुक्यात वीज नसल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हिंगणगावला जनरेटरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. माण तालुक्यातील दहिवडी येथे ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दहिवडी : माण तालुक्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटात पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. २४ तासांमध्ये तालुक्यातील दहिवडी मंडलात सर्वाधिक ६० मिमी तर सर्वात कमी कुकुडवाडमध्ये २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उकिर्डे घाटात झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी रात्रीच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. दहिवडी व परिसरातील बिदाल येथे ९ च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. वादळामुळे अनेक ठिकाणची वीज गायब झाली होती. पिंगळी येथे वीज नसल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. तालुक्यात जलयुक्तच्या माध्यमातून कामे झाली असल्याने पावसाचा थेंब ना थेंब जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. खंडाळा : खंडाळ्यासह परिसरात शनिवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. पहिल्याच पावसात खंडाळा तर जलमय झाला होता. काही ठिकाणी झाडे पडली. तसेच वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची वीज रात्रभर गुल झाली होती. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. खंडाळ्यात सलग दोन दिवस पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. सलग अडीच ते तीन तास दमदार पाऊस पडत होता. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह रात्रभरही पाऊस सुरूच होता. खंडाळ्यात वाऱ्यामुळे झाडे कोलमडली. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. पेट्री : कास परिसरात चांगला पाऊस झाला आहे. ठिकठिकाणी पाणी साठले असून गणेशखिंड, देवकल, परिसरातील रस्त्यावर झाडाच्या फांद्या तुटून पडल्या. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कास परिसरात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात काही प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. तसेच कुमुदिनी तलावातही बहुतांशी स्वरूपात पाणी साठले आहे. लोणंद : लोणंद व परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठून राहिले होते. वीज गेल्याने सर्वत्र अंधार पडला होता. शिरवळ : शिरवळलाही पाऊस झाला. वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. हा पाऊस बराचवेळ होता. आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात गत दोन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. वीज नसल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आदर्की परिसरातील हिंगणगाव, सासवड, टाकुबाईचीवाडी परिसरात पाऊस झाला. वादळी पावसात वीज खांबावरील कंडक्टर फुटल्याने चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. हिंगणगावला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीचा वीज ट्रान्सफॉर्मर जळाला आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात एकच हातपंप असल्याने लोकांची गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)कास तलावात सात फूट साठा सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावात सध्यस्थितीत केवळ सात फूट पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. सध्या सातारकर नागरिकांना पाणीपुरवठा तिसऱ्या व अंतिम व्हॉल्व्हद्वारे चालू आहे. शनिवारी रात्री जोरदार पावसाने कास तलाव परिसरात हजेरी लावली. परंतु तलावाच्या पाणी पातळीत कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. या पावसामुळे तलावातील पाण्याची पातळी स्थिर आहे, अशी माहिती पाटकरी जयराम कीर्दत यांनी दिली. ४आगामी काळात मोठा पाऊस होणे गरजेचे आहेअन्यथा सातारकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.माणमधील २४ तासांतील मंडलनिहाय पाऊस मिमीदहिवडी - ६०, मार्डी - ४८, गोंदवले २३, कुकुडवाड २, मलवडी ४६, शिंगणापूर ७ आणि म्हसवड २७.कास परिसरात भात, नाचणीच्या पेरणीस सुरुवातसातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या कास, बामणोली परिसरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. येथील शेतकरी वर्ग भात, नाचणीची रोपे करण्यासाठी पेरणी करू लागले आहेत. कास, बामणोलीसह कांदाटी, कोयना, सोळशी खोऱ्यात शेतकऱ्यांनी भाताची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे.