शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल डॉक्टरांच्या माथी...

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

खिशातून ३८ हजार भरले : पाटण पशुवैद्यकीय दवाखाना; पंचायत समितीची टाळाटाळ, वर्षभरापासूनचा प्रकार

पाटण : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीत अजूनही वीजपुरवठा जोडलेला नाही. जुन्या इमारतीतील वीजमीटरवरुन नव्या दवाखान्यात वीज वापर सुरू आहे. या वीज वापराचे बिल भरावे म्हणून वीजवितरण कंपनीने पशुवैद्यकीय दवाखान्याला नोटिसा दिल्या आणि वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा बंद करू, असा लेखी इशाराही दिला. त्यामुळे या दवाखान्याचे वीजबिल पशुधन विकास अधिकारी स्वत:च्या पगारातून भरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी ३८ हजार रुपये भरले आहेत. त्यांचे पैसे परत देण्यासाठी पंचायत समितीचा अर्थविभाग टाळाटाळ करत आहे. सुमारे ३८ गावांसह पाटण शहरातील पाळीव जनावरांची देखभाल व त्यांचे उपचार करणारे केंद्र म्हणजे केरा पुलानजीक असणारा पशुवैद्यकीय दवाखाना. या दवाखान्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन दीड वर्षापूर्वी अत्यंत घाई गडबडीत झाले. कारण, देसाई गटाचा सभापती असताना पाटणकर गटाने मोठ्या चतुराईने उद्घाटन केले. तेव्हापासून आजपर्यंत या नवीन इमारतीला नवीन वीजजोडणी मिळाली नाही. दुसरीकडे जुन्या दवाखान्याची इमारत मोडकळीस आलेली. पावसाळ्यात डॉक्टरांच्या टेबलवरच त्या इमारतीचा स्लॅब कोसळला म्हणून नव्या इमारतीत दवाखाना सुरू झाला. जुन्या इमारतीतील वीजमीटरचा वापर करून काम सुरू झाले आहे. संपूर्ण तालुक्यातील जनावरांच्या दवाखान्यास लागणारी लस या ठिकाणीच फ्रिजरमध्ये ठेवली जाते. (प्रतिनिधी) बँक अकाउंट नंबरची अ‍ॅलर्जी...पाटण पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी व्ही. बी. भोसले यांनी बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी पंचायत समितीला अकाउंट नंबर दिला आहे. मात्र जिल्हा बँकेला दिलेल्या पत्रात पंचायत समिती त्यांच्या बँक अकाऊंट नंबरच जाणीवपूर्वक टाकत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मी स्वत:च्या पगारातून पाटण पशुवैद्यकीय दवाखान्याचे वीजबिल जानेवारी २०१४ पासून भरत आहे. आत्तापर्यंत ३८ हजार रुपये भरले. त्याची वीजबीलू, पावती माझ्याकडे आहे. माझा कोणावरही आरोप नाही. फक्त मला माझे पैसे परत मिळावेत, एवढीच अपेक्षा.- व्ही.बी. भोसले, पशुधन विकास अधिकारी वर्ग -१