परळी : परळी परिसरातील उरमोडी धरणक्षेत्रात संततधार पाऊस असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातून दोन वक्र दरवाजातून पाणी सोडण्यात आले आहे. परंतु, उपसा सिंचन योजनेच्या दोन्हीही नवीन मोटारी खराब झाल्या आहे. परिणामी हजारो क्युसेक पाणी वाया जात आहे. याचे दररोजचे वीजबिल सुमारे दोन लाख म्हणजे महिन्याचे ६० लाख आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.संततधार पाऊस पडल्याने उरमोडी धरण काठोकाठ भरले असल्याने तीन हजार दशलक्ष क्युसेक पाणी पात्रातून वाहत आहे. हेच पाणी कालव्याद्वारे माण-खटाव या दुष्काळी भागांना जाते. धरण भरल्याने सांडव्यावरून नदीला पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. असे असतानाच माण-खटावला जोडण्यात आलेला कॅनॉल मात्र, कोरडाच आहे.वाठार किरोली व कोंबडवाडी उपसासिंचन योजनेच्या मोटारी ना दुरुस्ती असल्याने तसेच पाण्याची डिलेव्हरी पाईप बदलण्याचे काम पूर्ण न झाल्याचे कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले नाही. उरमोडी प्रकल्पात अतिरिक्त झालेले पाणी दुष्काळी माण-खटाव तालुक्यांत पोहोचलेले असते. तर तेथील तलाव भरून पाण्याचा प्रश्न मिटला असता. उरमोडी प्रकल्पाची निर्मिती माण-खटावच्या दुष्काळ हटविण्यासाठी झाली आहे. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने उरमोडीच्या पाण्यावरून सतत राज्यकर्त्यांत कलगीतुरा रंगलेला दिसतो. दुष्काळी काही दिवस येरळवाडीपर्यंत पाणी पोहोचले. मात्र, हे पाणी जेवढ्या क्षमतेने पोहोचणे गरजेचे होते. त्याच्या कित्येक कमी पटीने म्हणजे ५० ते १०० क्युसेकने पाणी वाठार-किरोली पंपहाऊसपर्यंत पोहोचले असे असताना ही उरमोडी प्रकल्पातील सुमारे पाच टीएमसी पाणीसाठा कमी झाला. याचा शोध धोम पाटबंधारे विभाग कधी घेणार केवळ तांत्रिक अडचणीमुळे २५ जूनपासून कॅनॉलचे पाणी बंद करण्यात आले आहे. रमोडी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक वाढल्याने प्रथम दोन वक्र दरवाजे व पुन्हा चार वक्र दरवाजे उचलून पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. हेच पाणी कोंबडवाडी पंपहाऊसमधून उचलून गेले असले तर खटाव-माण तालुक्यांला संजीवनी मिळाली असती. धरण व्यवस्थापनापासून वाठार-किरोली व लांडगेवाडी पंपहाऊसमधील जुन्या पाईप बदलणे काम सुरू असल्याने पाणी सोडण्याचे नियोजन थांबवण्याची माहिती मिळत आहे. पंपहाऊस सुरू झाल्यावरही हे पाणी प्रकल्पग्रस्तांना, दुष्काळग्रस्तांना कसे परवडणार? हा मोठा प्रश्न अहे. कारण पंपहाऊसच्या लाईट बिलाचा दररोजचा खर्च दोन लाख रुपये म्हणजे महिन्याकाडी ६० लाख रुपये आहे. पाटबंधारे, विभाग पाण्याचे नियोजन करण्यासाठी अग्रेसर आहे. कृष्णा खोरे महामंडळाला निधीचीही कमतरता नाही. एकंदरीत सर्व आहे. मात्र, त्यांची अंमलबजावणी अजून झालेली नाही. (वार्ताहर)मोटारी अडीच वर्षांत खराबकालव्याद्वारे दुष्काळी भागाना पाणी मिळावे म्हणून कृष्णा खोरे विभागाच्या वतीने वाठार-किरोली व कोंबडवाडी या दोन ठिकाणी उपसासिंचन योजनेच्या मोटारी बसविण्यात आल्या आहेत. मोटारी नवीन बसवून फक्त अडीच वर्षे झाले आहेत. मात्र, या मोटारी लगेच खराब कशा झाल्या? का चालू बसून बंद आहेत, असे दाखविले जात आहेत, असे अनेक आरोप दुष्काळी भागातील जनता करीत आहे.पाणी असूनही दुष्काळी भाग कोरडामाण-खटावला वरदायी ठरण्यासाठी किंवा त्यांना पाणी मिळावे, यासाठी उरमोडी धरणाच्या निर्मितीचा आराखडा करण्यात आला होता. परंतु १४१७ कोटींचा प्रकल्प उभा राहूनही त्या भागाला पाणी मिळत नाही. दुष्काळी भागाच्या नावाखाली सांगलीला पाणी जाते. पण दुष्काळी भागाला पाणी मिळत नाही. या पाण्यासाठी राजकीय नेते आम्ही हे करणार, ते करणार असे आश्वासनांचा पाऊस पाडणे प्रत्यक्षात नाही. त्यामुळे नक्की या मागचे करण कळेनासे झाले आहे.
वीजबिल दररोज दोन लाख रुपये
By admin | Updated: August 11, 2014 00:15 IST