शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

निवडणुकीची सूत्रे तरुणांच्या हातात...

By admin | Updated: November 2, 2016 00:09 IST

नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच : काँग्रेसचा बालेकिल्ला मोडण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना; गड राखण्यासाठी हालचाली वाढल्या

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या रणमैदानात मातब्बरांनी दंड थोपाटले असले तरी नगराध्यक्षपदासाठी आरक्षित असलेल्या प्रभागांमधून सर्वसमावेशक उमेदवार देण्यासाठी प्रमुख पक्षांच्या वर्तुळात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी निवडून येण्याची क्षमता याच निकषाचा विचार सुरू आहे. सत्तेचा गड राखण्याबरोबरच सिंह डरकला पाहिजे. यासाठी नगराध्यक्षपदावर निशाणा साधला जात आहे. मात्र, आजच्या छाननीमध्ये कोणाची दांडी गुल होणार यावर पुढील धोरणे अवलंबून असल्याने सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. खंडाळा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा-शिवसेना यांनी नगराध्यक्षपद राखीव असलेल्या प्रभाग क्र. ३, ८, १२, १६ आणि १७ या पाच प्रभागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या प्रभागांमधून एकूण २६ अर्ज दाखल झाले असले तरी तीन पॅनेलमधून केवळ १५ जणच लढत देण्याची शक्यता आहे. त्यामुळे १७ प्रभागांमधून पक्षीय पातळीवर लढत होण्याबरोबरच नगराध्यक्षपदाच्या प्रभागावर लक्ष वेधले जाणार आहे. त्यासाठी पक्षांच्या वतीने विशेष रचना केली जात आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात हात घालण्यासाठी राष्ट्रवादीने जोमाने तयारी केली असून, प्रत्यक प्रभागवार पक्षनेतृत्वाने प्रचाराची धुरा प्रमुखांवर सोपावली आहे. तर काँग्रेसने आपला मूळचा बांधा मजबूत करण्यावर भर दिला आहे. खंडाळ्याची निवडणूक ही तरुण फळीच्या हातात असल्याने सर्वच पक्षांनी पक्षातील दुसऱ्या पलटणीवर जबाबदारी सोपावली आहे. काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश गाढवे, किरण खंडागळे, प्रल्हाद खंडागळे, योगेश गाढवे, संतोष बावकर, सचिन खंडागळे, स्वप्निल खंडागळे, युवराज गाढवे, जोतिबा जाधव अशी तरुणांची मजबूत फळी प्रचाराच्या आखाड्यात उतरणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वतीने अ‍ॅड. शामराव गाढवे यांच्या नेतृत्वाखाली शैलेश गाढवे, प्रशांत गाढवे, अशोक गाढवे, दयानंद खंडागळे, केतन देशमुख, सागर गुरव, धैर्यशील नरुटे या तरुण फळीने जोरदार प्रतिउत्तर देण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपा-शिवसेनेच्या युतीचा फॉर्म्युला अंतिम झाल्यानंतरच प्रचाराची रणनीती ठरणार असल्याने दोन्ही पक्षांमध्ये सध्यातरी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चीच भूमिका आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश येतील त्याचप्रमाणे घडेल असेच बोलले जात आहे. मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर सूत जुळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नगरपंचायतीच्या सभागृहात आपली वर्णी लागावी यासाठी पक्षाचे अधिकृत तिकीट आपल्याच पदरात पडावे, यासाठी इच्छुकांनी आपले पदर पक्षप्रमुखांकडे पसरले आहेत. यामुळे मंगळवारी छाननीमध्ये पक्षाच्या तिकिटाचे दान कोणाच्या पदरात पडणार यावरच लढतीचे चित्र अवलंबून आहे. तिकीट कोणाचे याची अंतिम यादी काँग्रेस-राष्ट्रवादीने तयार केल्याची चर्चा असली तरी उमेदवारांना याची खबर अद्याप नसल्याने आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे. (प्रतिनिधी)