शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांना आवरल्यानेच निवडणूक सोपी

By admin | Updated: March 2, 2017 23:46 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा दावा : आक्रमक कामकाजाद्वारे विरोधकांवर दहशत बसविण्याचे आवाहन

सातारा : ‘खासदारांना आम्ही सातारा व जावळी तालुक्यांत आवरून धरल्यानेच इतर तालुक्यांत राष्ट्रवादीच्या नेत्यांना निवडणूक सोपी झाली,’ असा दावा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी भवनात केला. आक्रमक कामकाजाद्वारे विरोधकांवर दहशत बसविण्याचे आवाहनही त्यांनी केले. येथील राष्ट्रवादी भवनात पक्षाच्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, वाई तालुकाध्यक्ष प्रतापराव पवार, सुधीर धुमाळ यांची उपस्थिती होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ते सर्वच जिल्ह्यांत उमेदवार उभे करून राष्ट्रवादीला त्रास देण्याची शक्यता होती. मात्र, आम्ही त्यांना सातारा व जावळी तालुक्यातच आवरून धरले. खासदारांच्या गाडीवर दगडफेक झाली, यातूनच त्यांची दहशत संपल्यात जमा असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नूतन सदस्यांनी पक्षनिष्ठा कायम राखावी. विरोधकांना हाताशी धरून पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊ नका. कामात आक्रमकपणा दाखवला तरच विरोधक नमवतील,’ असा सल्लाही त्यांनी आपल्या भाषणातून दिला.आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये काही पक्षांनी अमाप पैसा वाटला. आमच्या पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून त्या सत्ताधारी पक्षासोबत गेले. विधान परिषद निवडणुकीतील अनुभव पाहिल्यानंतर पक्षाशी व नेत्यांशी प्रामाणिक असणाऱ्या उमेदवारांनाच तिकिटे दिली. नूतन सदस्यांनी सुरुवातीला मतदार संघाचा दौरा करावा. कामाचा तक्ता तयार करावा, आता कामाला लागूया, पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन काही करू नका.’मानकुमरे जामीन घेऊनच सत्कारालाजिल्हा परिषदेचे नूतन सदस्य वसंत मानकुमरे हे जामीन घेऊनच सत्काराच्या कार्यक्रमाला आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना विजयी मिरवणूक काढता आली नव्हती, मात्र सत्काराच्या ठिकाणी ते जामीन घेऊनच आल्याची कोटी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.