मलकापूर : वारुंजी (ता. कऱ्हाड) येथील पंचायत समिती सदस्य व उद्योजक नामदेव पाटील यांची राष्ट्रीय आरोग्य समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
नामदेव पाटील यांनी वारुंजीसह परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योगदान दिले आहे. त्याचबरोबर कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते अग्रक्रमावर असतात. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते सध्या पंचायत समितीचे सदस्य असून वारुंजी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये त्यांनी वारुंजी जिल्हा परिषद गटातील सहाशे ते सातशे लोकांना रुग्णालय बेड्स, औषधे व आर्थिक मदत केली. तसेच पहिल्या लाटेत ऑक्सिजनअभावी मृत्यूच्या घटना घडत होत्या. अशा वेळी पाटील यांनी ऑक्सिजनची गरज ओळखून गावागावांत ऑक्सिजन मशीनचे वाटप करून लोकांचे प्राण वाचवण्यास हातभार लावला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मदतीची परंपरा कायम ठेवत दोनशे ते अडीचशे लोकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली. कोरोनाकाळात केलेल्या कामाची दखल घेऊन नामदेव पाटील यांची राष्ट्रीय आरोग्य समिती सदस्यपदी निवड झाली.
फोटो २६नामदेव पाटील
260821\download.jpeg
नामदेव यांचा फोटो