शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

खमंग चिवड्यासाठी आठ प्रकारचे पोहे !

By admin | Updated: October 22, 2016 00:02 IST

कर्नाटकातून होतेय आयात : भाजक्या डाळींच्या दरात वाढ

सातारा : दिवाळी का आवडते, हा प्रश्न लहानांना विचारला तर एक उत्तर हमखास मिळेल, ‘दिवाळीत लाडू, चिवडा, चकली खायला मिळते.’ खरंय, बदल्यात जीवनशैलीनुसार गावागावांत गोड पदार्थ कमी खाल्ले जात असले तरी चिवडा हा प्रत्येकाच्या घरात होतोच होतो. खमंग चिवड्यासाठी साताऱ्यात आठ प्रकारचे पोहे आले आहेत. दिवाळीमध्ये चिवड्याच्या निमित्ताने पोह्यांना मोठी मागणी असल्याने साताऱ्यातील बाजारपेठेत कर्नाटकातून पोहे दाखल झाले आहेत. यामध्ये सुपर, भाजके, दुधी, नायलॉन, पातळ, कांदा, मका, दगडी असे पोहे विक्रीस आले आहेत. काही घरांमध्ये चिरमुऱ्यांचा चिवडा लागतो तर कोणाच्या घरात दगडी पोह्यांचा. कोणाला कुरकुरीत चिवडा लागतो तर कोणाला तोंडात टाकल्याबरोबर विरगळणारा हवाय. साताऱ्यात दाखल झालेल्या प्रत्येक पोह्याची चव न्यारी आहे. त्यांचा आकार, गुणधर्मानुसार ग्राहक पोह्यांची निवड करतात. सुपर पोहे हे पूर्वापार चालत आलेले असून, त्यांना आजही तशीच मागणी आहे. (प्रतिनिधी) चिवडा मसाल्यांना मागणी ४आजीच्या काळात चिवडा बनविताना घरातीलच जिरे, मोहरी, कडीपत्ता, हळद, लसूण टाकला जात असायचा; पण आता गृहिणींना वेळ नसल्याने आयता मसाला वापरण्याला पसंती दिली जाते. त्यामुळे अनेक कंपन्यांनी असे तयार मसाले विक्रीस आणले आहेत. त्यांना मागणी वाढत आहे. भाजकी डाळ आवाक्याबाहेर चिवडा बनविताना भाजकी डाळ एक आवश्यक घटक असतो. डाळीशिवाय चिवड्याला चवच येत नाही; पण यंदा डाळी टाकताना हात आकडता घ्यावा लागणार आहे. गेल्यावर्षी १२० रुपये किलोने विक्री होत असलेली डाळ आता १८० रुपयांच्या घरात पोहोचली आहे.