शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आठ जनावरे आगीत होरपळली

By admin | Updated: January 26, 2016 00:51 IST

येणपेतील घटना : आग विझविताना एकजण जखमी

उंडाळे : कऱ्हाड तालुक्यातील येणपे-चोरमारवाडी येथे जनावरांच्या शेडला आग लागल्यामुळे ८ जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. आगीत सुमारे २ लाखांचे नुकसान झाले असून, आग विझवताना शेडचे मालक विष्णू चोरमारे हेसुद्धा जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चोरमारवाडी-येणपे येथील विष्णू अण्णा चोरमारे व यशवंत आबा चोरमारे यांचे राहत्या घराशेजारी जनावरांचे शेड आहे . या शेडमध्ये सहा म्हशी, एक गाय व खिलार वासरू बांधले होते. दोन्ही कुंटुबातील लोक जेवण करून झोपले होते. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या शेडला अचानक आग लागल्याने जनावरांनी जोरदार हंबरडा फोडला. दरम्यान, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे जनावरांचा चारा व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत आठ जनावरे ७० टक्यांहून अधिक भाजली. यावेळी आग शमविण्यासाठी गेलेले विष्णू चोरमारे यांचा चेहरा भाजला असून, त्यांच्यावर उंडाळे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेनंतर गावकामगार तलाठी जी.एच. धराडे व रमेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जळिताचा पंचनामा केला. या आगीत सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे . (वार्ताहर) सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत येळगाव व परिसरातील परगावी असणारे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत आहेत . परगावी असणाऱ्यांना आपला गावात, परिसरात काय घटना घडली तर सोशल मीडियाच्या माध्यमातून समजते. चोरमारवाडी येथील घटना घडल्यानंतर रमेश शेटे यांच्यासह ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या ग्रुपवरील शंभर जणांकडून प्रत्येकी शंभर रुपये काढून जमा झालेली दहा हजारांची रक्कम जळीतग्रस्तांना मदत म्हणून दिली.