शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर : पृथ्वीराज चव्हाण

By admin | Updated: July 9, 2014 00:10 IST

राज्यात नेतृत्वबदल होणार नाही,

कऱ्हाड/पंढरपूर : राज्यात नेतृत्वबदल होणार नाही, असे ठामपणे सांगत नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर पसरविल्या जात आहेत, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगावला.आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेसाठी पंढरपुरात दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅन्थनी समितीने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात नेतृत्वबदल होईल, अशा चर्चांना ऊत आला आहे. पक्ष नेतृत्वाने कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला असून, ते तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा आज दिवसभर होती; मात्र स्वत: विखे यांनीच याचा इन्कार केला. ते आज मुंबईतच होते. उद्योगमंत्री नारायण राणे यांचेही नाव चर्चेत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १४४ जागांची मागणी करत प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविली आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, हे त्यांचं वैयक्तिक मत असून त्यावर मी भाष्य करणार नाही; पण जागावाटपाचा फॉर्म्युला जुनाच असून त्यात फारसा बदल होणार नाही. जागांच्या अदलाबदलीबाबत दोन्ही पक्षांच्या दिल्लीतील नेत्यांची बैठक होऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल. आम्ही पाच निवडणुका एकत्रित लढलोय. तुम्ही चिंता करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.