शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या आठवणीसाठी शैक्षणिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 01:42 IST

निवृत्त अभियंत्यांची आस्था : १५० खेड्यांत शैक्षणिक अंकाचे मोफत वितरण == गुड न्यूज

शिरवळ : स्पर्धेच्या युगात एकमेकांच्या सुख-दु:खात मिसळण्यासाठीही कोणा व्यक्तीकडे वेळ नसल्याचे चित्र आहे. मात्र, असे काही व्यक्ती असतात की ज्यांना समाजाप्रती असणारी आस्था निवृत्ती नंतरही स्वस्थ बसू देत नाही. त्यापैकीच पाटबंधारे विभागामधील निवृत्त शाखा अभियंता (सिव्हील) चतुर्भुज रामभाऊ खोपडे हे अवलिया. आपली दिवंगत थोरली बहीण मुक्ताबाई सर्जेराव बांदल यांचे नाव समाजामध्ये आठवण म्हणून सतत तेवत राहण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.खोपडे यांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी स्वखर्चातून व आपले नातेवाईक हणुमंत शंकरराव खोपडे यांच्या सहकार्यातून आपली दिवंगत थोरली बहीण मुक्ताबाई सर्जेराव बांदल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना विनामूल्य शैक्षणिक सर्वसाधारण माहितीच्या अंकाचे वितरण केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक जगाची ओळख होऊन करिअर घडविण्यासाठी मदत व्हावी. या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून म्हणजे १६ मे २०१५ पासून कार्यरत आहेत.आजपर्यंत चतुर्भुज खोपडे यांनी सातारा, पुणे, रायगड जिल्ह्यांमधील ११ तालुक्यांमधील सुमारे १५० खेडेगावांत जाऊन पालकांची व शिक्षकांची भेट घेत सुमारे ३९०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना या शैक्षणिक अंकाचे वितरण केले असून, यासाठी त्यांना स्वत:च्या वाहनातून तब्बल ४५०० च्यावर किलोमीटरचा प्रवास स्वखर्चातून करावा लागला आहे. सातारा जिल्ह्यातील दहिवडी तालुका ४ गावे, खंडाळा तालुक्यताील १८ गावे, फलटण तालुक्यातील ५ गावे, पुणे जिल्ह्यातील भोर तालुका ५६ गावे, पुरंदर तालुका २० गावे, बारामती तालुका ७ गावे, हवेली तालुका १५ गावे, मावळ तालुका ६ गावे, मुळशी तालुका ८ गावे, वेल्हा तालुका ५ गावे, तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सहा गावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)लेक टॅपिंग लेक्चरविशेष म्हणजे चतुर्भुज खोपडे यांनी विविध जिल्ह्यांमध्ये कोयना धरणातील लेक टॅपिंगबाबत विविध विद्यालयांमध्ये ५८ लेक्चर दिली आहेत. अशा या अवलिया असणाऱ्या चतुर्भुज खोपडे यांच्या चेहऱ्यावर समाजासाठी आपण काहीतरी करू शकलो याचे समाधान मोठ्या प्रमाणात दरवळत आहे.थोरली बहीण मुक्ताबाई बांदल यांनी दिलेली शिकवण व त्यांची आठवण समाजामध्ये तेवत राहून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा घडला पाहिजे या उद्देशाने शैक्षणिक अंकाचे स्वखर्चातून विनामूल्य वितरण करीत आहेत.-चतुर्भुज खोपडे, निवृत्त शाखा अभियंता, सातारा