शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेल डबा दरात पुन्हा उतार; पाऊच भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST

सातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात खाद्यतेलाच्या दरात उतार आला आहे. १५ किलोंच्या तेल डब्यामागे सरासरी १५० रुपये कमी ...

सातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात खाद्यतेलाच्या दरात उतार आला आहे. १५ किलोंच्या तेल डब्यामागे सरासरी १५० रुपये कमी झाले आहेत. सूर्यफूल, शेंगदाणा तेल डबा २,४०० पर्यंत मिळत आहे, तर एक लीटरच्या पाउचचे दर जैसे थे आहेत. त्याचबरोबर, साताऱ्यात पालेभाज्या महागच असून, वाटाणा ८ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. कोरोना लॉकडाऊनमुळे शनिवारी आणि रविवारी बाजार समिती बंद होती, पण शुक्रवारी ३२५ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली होती. कांद्याची आवक झाली नसली, तरी क्विंटलला २ हजारांपर्यंत दर मिळत आहे, तर वांग्याचाही दर वाढल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ४० ते ६० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला २०० ते ३०० रुपये भाव आला. आल्याला क्विंटलला दीड हजार तर लसणाला ७ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले.

खाद्यतेल मार्केट

मागील १५ दिवसांपासून खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. सध्या खाद्यतेलाचा सूर्यफूल डबा २,३५० ते २,४०० पर्यंत मिळत आहे, तर पामतेलचा १,८०० ते १,८५०, शेंगदाणा तेल डबा २,४०० ते २,४५० आणि सोयाबीनचा २,१५० ते २,२५० रुपयांपर्यंत मिळत आहे, तर सोयाबीन तेल पाऊच १५०, सूर्यफूलचा १८० रुपयांना मिळत आहे.

आंबा आवक कमी

बाजार समितीत आंब्याची आवक कमी झाली. आंब्याची ८ आणि पपईची २ क्विंटल आवक झाली. त्याचबरोबर, डाळिंब, संत्रा, पेरूची आवक झाली नाही.

बटाटा फक्त स्वस्त

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत, पण बटाट्याला अद्यापही दर कमी आहे. क्विंटलला १,४०० ते १,६०० रुपये दर मिळला, तर दोडक्याला १० किलोला ४०० ते ५०० रुपये, ढबू ३०० ते ४००, शेवगा शेंग ४०० ते ५००, पावटा ६०० ते ७००, गवारला ४०० ते ५०० दर १० किलोला मिळाला.

प्रतिक्रिया

आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले होते, पण सध्या मागणी कमी आणि आवक वाढल्याने दरात उतार आला आहे. तेलाच्या डब्यामागे घट आहे, पण पाउचचे दर कमी झाले नाहीत.

- संभाजी आगुंडे,

विक्री प्रतिनिधी

कोरोनामुळे अडीच महिन्यांपासून भाजी मंडई बंद आहे. यामुळे भाजीपाला मिळविताना अनेक अडचणी होत्या. आता भाज्या मिळतात, पण दर वाढलेले आहेत. कोणतीही फळभाजी ४० रुपये किलोच्या पुढे आहे.

- रामचंद्र पवार, ग्राहक

सातारा बाजार समितीत वाटाण्याला एकदम चांगला दर मिळत आहे, तर वांगी, दोडका, शेवगा शेंग, पावटा यांनाही भाव मिळू लागलाय, पण कोबी, टोमॅटो, कांद्याला दर अजूनही कमीच मिळत आहे.

- सोपान पाटील, शेतकरी

..............................................................................................................................................................................................