शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

पूर्वभागात राष्ट्रवादीला खिंडार!

By admin | Updated: August 14, 2015 00:08 IST

फलटण तालुका : रासप-काँग्रेस डोकेदुखी ठरणार

नीलेश सोनवलकर - दुधेबावी  फलटण तालुक्यातील पूर्व भागातील बहुतांशी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात रासप व काँग्रेसने सत्तांतर घडवून आणल्याचे चित्र दिसत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस व रासप राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसू लागले आहे.फलटण तालुक्यातील पूर्वभागात भाजप-शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवत नसल्याने राष्ट्रवादीला तगडा विरोधक उरला नव्हता; परंतु ‘काँग्रेस व रासप’ने ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे.यामध्ये बहुतांशी गावांमध्ये राजेगट विरुद्ध राजेगट अशीच लढत होती. मात्र, ज्या ठिकाणी राजेगट विरुद्ध काँग्रेस किंवा रासप असेल याठिकाणी निश्चितच थोडाफार का होईना बदल झालेला दिसून आला आहे. यामुळे ज्या गावामध्ये विरोधी गट कार्यरत आहे. त्याठिकाणी सत्ताधारी राष्ट्रवादीला येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसत आहे.फलटण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये सरडे, जाधववाडी, कुरवली, टाकळवाडी या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. जावली ग्रामपंचायतीवर रासपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. फलटण तालुक्यातील झिरपवाडी, आंदरुड, कोळकी, राजुरी, गुणवरे यासह अनेक ग्रामपंचायतींमध्ये रासप व काँग्रेसने चंचू प्रवेश केला आहे.राजुरीमध्ये धनंजय पवार यांचा गट पडून सांगळे गट सत्तेत आला आहे. तर निंबळकमध्ये राम निंबाळकर यांचा गट विजयी झाला आहे. तसेच राजाळे येथे विश्वासराव भोसले यांच्या गटाचे पानिपत होऊन राजेगट विजयी झाला आहे. तसेच सुमारे ४० वर्षांनंतर पवारवाडी येथे सत्तांतर घडवून आणण्यात राष्ट्रवादीच्याच तरुण वर्गाला यश आले आहे.फलटण तालुक्यात सध्या झालेल्या निवडणुकीमध्ये सुमारे ७० टक्के ग्रामपंचायती तरुण वर्गाला हाती घेण्यात यश मिळाले असल्याचे दिसत आहे. मिरढे, राजाळेत राष्ट्रवादीला यश...भाडळीखुर्द, सासकल, तिरकवाडी, सोनवडी बु, सोनवडी खुर्द, मिरढे, आंदरुड, मुंजवडी, नाईकबोमवाडी, राजाळे, पवारवाडी, निंबळक या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला यश मिळाले आहे.विविध विकासकामे व तरुणांच्या पाठिंब्यामुळे ग्रामपंचतीत विजय मिळवत आला आहे. आगामी निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत.-दिगंबर आगवणे, जिल्हाध्यक्ष स्वराज संघटना