शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५५ हजार कुटुंबांना भूकंपग्रस्त दाखले

By admin | Updated: December 26, 2015 00:10 IST

शंभूराज देसाई : पाटणमधील २४ गावांतील रस्त्यांसाठी साडेआठ कोटी मंजूर

कऱ्हाड : ‘पाटण तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भूकंपग्रस्तांच्या दाखल्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय अधिवेशनात घेतला आहे. या तालुक्यातील ५५ हजार कुटुंबीयांना भूकंपग्रस्त दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे पाटण तालुक्यातील विविध २४ रस्त्यांसाठी साडेआठ कोटी ३२ लाख रुपये अधिवेशनात मंजूर करण्यात आले आहेत,’ अशी माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.कऱ्हाड येथे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवदौलत बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद पाटील उपस्थित होते. आमदार देसाई म्हणाले, ‘हिवाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण अशा चर्चा पार पडल्या. यामध्ये व्याघ्र प्रकल्पासारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत राज्य शासनाकडून पाच आमदारांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे. ‘जलयुक्त शिवार’ अभियानासाठी राज्य सरकारने एक हजार कोटी दिल्यानंतर हे अभियान आमदारांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मतदारसंघात राबविण्यात यावे, अशी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय आमदारांकडून मागणी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. पश्चिममेकडील व्याघ्र प्रकल्पासह अन्य वनहद्दीतील गावांमध्ये वन्यप्राण्यांपासून शेती पिकांचे व फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याबाबत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली गेल्यानंतर ती शासनाकडूनही दिली जात होती. मात्र, यावेळेस नुकसान भरपाई दुप्पट रकमेने देण्याचा निर्णय राज्य सरकारने या अधिवेशनादरम्यान घेतला आहे.राज्य सरकारचे काम उत्तमरितीने सुरू आहे. जे यापूर्वीच्या सरकारला जमले नाही, ते काम युती सरकारने करून दाखवले आहे. कोल्हापूरला टोलमुक्त केले आहे, तर पाटणला भूकंपग्रस्तांचे दाखले देण्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केले असल्याची माहितीही आमदार शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)