शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम शाळांचा ‘आयएसओ’मध्ये डंका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 22:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : तालुक्यात संथगतीने का होईना प्राथमिक शिक्षणाचा प्रचार सुरू झाला आहे. डोंगरदºयांनी वेढलेल्या या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी कात टाकली आहे. तालुक्यातील शाळा डिजिटल तसेच आयएसओ होत आहेत. सध्या तालुक्यातील ६१ शाळा आयएसओ झाल्या असून, या शाळेत एलसीडी प्रोजेक्टर, संगणक, लॅपटॉप, टॅबसह अनेक आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : तालुक्यात संथगतीने का होईना प्राथमिक शिक्षणाचा प्रचार सुरू झाला आहे. डोंगरदºयांनी वेढलेल्या या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी कात टाकली आहे. तालुक्यातील शाळा डिजिटल तसेच आयएसओ होत आहेत. सध्या तालुक्यातील ६१ शाळा आयएसओ झाल्या असून, या शाळेत एलसीडी प्रोजेक्टर, संगणक, लॅपटॉप, टॅबसह अनेक आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरºयांतील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत.पाटण तालुक्यात एकूण ३२५ महसुली गावे आहेत. या महसुली गावांत आणि वाडी-वस्तीमध्ये एकूण ५३२ शाळा आहेत. त्यामध्ये तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीच्या एकूण ३८६ शाळा आहेत. तर पहिली ते सातवीच्या १४६ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. गटशिक्षणाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली ६ विस्तार अधिकारी, २२ केंद्र प्रमुख, ६ वरिष्ठ मुख्याध्यापक, २९५ पदवीधर शिक्षक आणि ९७४ उपशिक्षक ग्रामीण आणि डोंगरदºयांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करत आहेत. तालुक्यात एक शिक्षकी एकही शाळा राहिलेली नाही. हे काम करताना त्यांना स्थानिक अडचणीदेखील येतात. या अडचणीवर शिक्षणाधिकारी आणि प्रशासनाकडून मार्ग काढून तालुक्यातील शिक्षणाची गंगा वाडी-वस्तीवर पोहोचविण्याचे काम सुरू आहे. तालुका डोंगराळ असला तरी या डोंगरातील विद्यार्थी ज्ञानार्जनामध्ये कमी पडू नये. तसेच नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञानही तालुक्यातील विद्यार्थ्यांना देण्याचे काम पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून होत आहे.शिक्षणाची गंगोत्री तालुक्यातील खेडेगावातही पोहोचली आहे. प्रत्येक वाडी-वस्तीवर शिक्षण पोहोचले आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि नेतेमंडळी, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील शिक्षणासाठी मदत करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहेत. लोकसहभागाच्या माध्यमातून एलसीडी प्रोजेक्टर, संगणक, इंटरनेट यासारखे आधुनिक तंत्रज्ञान शाळांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. तालुक्यात जिल्हा परिषद शाळांसाठी सुमारे २५ लाख रुपये लोकसहभागातून मिळाले आहेत. यावरून तालुक्यातील ग्रामस्थ शिक्षणाबाबत किती जागरुक आहेत, हे दिसून येते.तालुक्यात शाळेच्या इमारती चांगल्या प्रकारच्या असून, शाळेला कंपाऊंड, प्रवेशद्वार त्याचबरोबर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली आहे. याबरोबरच शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे ओळखपत्र देण्यात आली आहेत. व्याघ्रप्रकल्प बाधित असणाºया शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना लॅपटॉपच्या माध्यमातून जगाची ओळख करून देत आहेत. तर गावडेवाडी या डोंगराळ शाळेत मुलांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेच्या भिंतीवर गणिताची सूत्रे, इंग्रजी शब्दचित्र स्वरुपात तसेच थोर व्यक्तींचे महात्म्य सांगणारे लेख, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्याचे मंत्रिमंडळ यांची माहिती रेखाटण्यात आली आहेत. तालुक्यात ५३२ शाळा या प्रगत आहेत.तालुक्यातील उल्लेखनीय शाळा...पाटण तालुक्यात डोंगरामध्ये असणाºया गावढेवाडी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याद्वारे शाळेच्या पटांगणातील हालचाली तसेच वर्गातील शिक्षकांचे ज्ञानदानही चित्रीत केले जाते. तारळे विभागातील भैरेवाडी येथील प्राथमिक शाळेत सर्वच विद्यार्थ्यांना टॅबद्वारे शिक्षण देण्यात येते. तर पाथरपुंजसारख्या दुर्गम शाळेत लॅपटॉपवर संगीत, पाढे शिकविण्यात येतात. चित्रफितीद्वारे हसत खेळत शिक्षण दिले जाते.शिक्षण विभागात अनेक पदे रिक्तपाटण तालुक्यात शिक्षण क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. असे असताना तालुक्याच्या शिक्षण विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी ३, केंद्रप्रमुख २१, पदवीधर शिक्षक ५७, उपशिक्षकांची १७२ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरल्यास शिक्षण क्षेत्रात आणखी प्रगती होऊ शकते.