शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’च्या कामांचा जिल्ह्यात डंका

By admin | Updated: March 24, 2015 00:18 IST

३५ कोटींची तरतूद : चांगला पाऊस झाल्यास ९५ टक्के टंचाईमुक्तीचा विश्वास

सातारा : जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवारच्या कामांचा धडाका सुरू आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजनमधून ३५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास पूर्ण झालेल्या कामांच्या आधारावर संपूर्ण जिल्हा ९५ टक्के टंचाईमुक्त होऊ शकतो, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, ‘जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पाझर तलाव दुरुस्ती व गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. अभियान अधिक व्यापक व सक्रिय करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ३५ कोटी ८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील २१५ गावांची निवड करण्यात आली असून, त्यातील ५५ कामे लोकसहभागातून सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांतच १९३ कामे पूर्ण झाली आहेत. सध्या ५६ कामे प्रगतिपथावर आहेत. १८० पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात आली आहे. ३७ पाझर तलावांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ६४ लाखांचा निधी लोकसहभागातून उपलब्ध झाला आहे. अनेक गावांतील लोक या अभियानासाठी काम करत आहेत. विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून सात कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. याअंतर्गत १६ हजार विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या जून महिन्यापर्यंत १ हजार ५५ विहिरींच्या कामाचे उद्दिष्ट आहे.’‘यावर्षी हाती घेतलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे चांगला पाऊस झाला तर जिल्हा ९५ टक्के टंचाईमुक्त होईल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. हिवरे, नलवडेवाडी तसेच जखिणवाडी या गावांनी जलसंधारणात क्रांती केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)