शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा देणारही नाही अन् घेणारही नाही

By admin | Updated: March 25, 2017 15:13 IST

कामाठीपुऱ्यात महिलांसाठी कार्यशाळा : भटक्या विमुक्त समाजातील महिलांनी केला ठराव

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २५ : समाजातील मुलीचा हुंडा घेणार नाही व हुंडा देणार नाही, त्याचबरोबर हुंडा या विषयावर काम करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा कामाठीपुरा येथे झालेल्या एका कार्यक्रमात भटक्या विमुक्त समाजातील महिलांनी केली. याबाबतचे दोन ठरावही मांडण्यात आले आणि त्याला एकमुखी मान्यताही देण्यात आली.सर्वसमावेशक सामाजिक विकास संस्थेच्या वतीने कामाठीपुरा येथे भटक्या विमुक्त महिलांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी हा ठराव करण्यात आला. अध्यक्षस्थानी पूजा कुडाळकर होत्या.

यावेळी जिल्हाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांनी आपले अनुभव मांडले. दरम्यान, छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी ह्यहुंडाह्ण या विषयावर पथनाट्य सादरीकरण केले. यावेळी पूजा कुडाळकर आणि द्वारका पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी इस्लामपूर येथील प्रा. अर्जुन लाखे, प्रा. सतीश चौगुले, इकोनेट संस्थेच्या गौरी भोपटकर, उषा कुडाळकर, मीराताई कुडाळकर, कोयना जावळीकर, रजनी पवार, सर्वसमावेशक संस्थेच्या अध्यक्षा शैला यादव, नारायण जावलीकर यांची भाषणे झाली. रमेश जावळे यांनी आभार मानले. शैला यादव आणि गौरी सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अ‍ॅड. पवन जावळीकर, संदीप कुडाळकर, शंकर जावळे, अरुण जावळीकर, सज्जन कुडाळकर, कमल माळी आदी उपस्थित होते.

येथील कामाठीपुरा येथे झालेल्या भटक्या विमुक्त समाजातील महिलांच्या मेळाव्यात शैला यादव यांनी मार्गदर्शन केले. भटक्या विमुक्त महिला मेळाव्याचे संयोजन अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी संघटना, सार्थक महिला मंडळ, सातारा, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र आणि कामाठीपुरा येथील शिवाजी गणेश उत्सव मंडळाने केले. (प्रतिनिधी)