शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या भगदाडास डांबरी ठिगळ

By admin | Updated: March 10, 2017 22:52 IST

पाचवडमध्ये डोळेझाक : भविष्यात ‘भुर्इंज’ घटनेच्या पुनरावृत्तीची शक्यता

पाचवड : राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पाचवड, ता. वाई येथील उड्डाणपुलास गुरुवारी सिमेंटचा काही भाग तुटून भगदाड पडल्याची घटना घडली अन् पाचवडकरांच्या काळजाचा ठोका चुकल्यासारखे झाले. काही दिवसांपूर्वी भुर्इंज येथील उड्डाणपूल खचून कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता पाचवडच्या उड्डाणपुलाचीही रिलायन्स कंपनी व आयटीडीच्या ठेकदारांनी निकृष्ट काम करून पाडापाडीची मालिका सुरूच ठेवल्याने आपल्या दर्जाहीन कामाची जणू पोच पावतीच दिली असल्याची संतप्त भावना पाचवडकरांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पडलेल्या भगदाडाचे कोणतेही निरीक्षण सक्षम अधिकाऱ्यांकडून न करता त्यावर तात्पुरते पॅचवर्क करून भगदाड झाकून टाकण्याचे काम ठेकेदारांनी केले असून, त्याठिकाणी भविष्यात मोठी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम देशाच्या विकासाचे जरी असले तरी सुरुवातीपासूनच ते शेतकरी व नागरिकांच्या जणू जीवावर उठल्यासारखेच आहे. रिलायन्सच्या ठेकेदारांनी मनमानी कारभार करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सहापदरीकरणात केल्याने आजपर्यंत अनेकांना महामार्गावर आपले प्राण सोडावे लागले आहेत. भुर्इंजचा उड्डाणपूल नुकताच वाहतुकीसाठी एका बाजूने सुरू केला असून, पाचवडचा उड्डाणपूलही लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता. मात्र, अचानक उड्डाणपुलास भगदाड पडल्याने उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, गुरुवारी रात्रभर पडलेल्या भगदाडाच्या खालील बाजूकडून वेल्डिंग व इतर काम केल्यानंतर शुक्रवारी उड्डाणपुलावर डांबर टाकून पॅच मारण्याचे काम रिलायन्सच्या ठेकदारांकडून सुरू होते. जिल्हा प्रशासकीय अधिकारी अथवा नॅशनल हायवे अ‍ॅथॉरटीचा सक्षम अधिकारी या उड्डाणपुलाकडे फिरकलाही नाही. (वार्ताहर)सहापदरीकरणाचे काम ग्रामस्थांच्या मुळावर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम पाचवडकरांच्या जणू मुळावरच उठले आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ओढ्यांचे प्रवाह सोडण्यापासून ते उड्डाणपुलास भगदाड पडण्यापर्यंत होत आलेले काम पाचवडकरांसाठी मोठी डोकेदुखीच ठरलेली आहे. येथील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनही वारंवार तोडून नागरिकांबरोबरच येथील ग्रामपंचायतीलाही आजपर्यंत अतोनात नुकसान सोसावे लागले आहे. आपल्या दैनंदिन कामासाठी उड्डाणपुलाखालून ये-जा करणारा येथील स्थानिक नागरिकभगदाड पडल्यापासून घाबरला असून, आपला जीव मुठीत घेऊनच या पुलाखालून तो जात आहे. ठेकेदारांचा रात्रीस खेळ चालेआजपर्यंत रात्रीचे काम करून बाजारपेठेतील पाचवडकरांची झोप उडवलेल्या महामार्गाच्या ठेकेदारांनी गुरुवारची रात्रही भगदाड मुजविण्यात घालविली. पडलेले भगदाड मुजवण्यासाठी रात्रीचा खेळ करून भगदाडास लिपण लावण्याचे काम या ठेकेदारांनी केले. मात्र, त्यांचा चाललेला रात्रीचा खेळ पाचवडकरांना भविष्यात किती किंमत मोजायला लावणार हे येणारा काळच सांगेल.