शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यासाठी उघडले किल्ल्याचे दक्षिणद्वार!

By admin | Updated: February 19, 2016 00:19 IST

अजिंक्यतारा : प्राण्यांना ये-जा करण्यासाठी केली गेली होती मागणी '

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याला दक्षिण बाजूकडे नव्याने बसविण्यात आलेल्या दरवाजामुळे वन्यप्राण्यांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाला असल्याची चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरात सुरू होती. याची दखल घेऊन बुधवारी काही प्राणिमित्रांनी हा दरवाजा वन्यप्राण्यांसाठी उघडला. ऐतिहासिक वारसा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याला काही दिवसांपूर्वी दक्षिण बाजूकडील दरवाजा नव्याने बसविण्यात आला. हा दरवाजा बंद असल्यामुळे वन्यप्राण्यांचा मार्ग खुंटत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. दरवाजा बंद अवस्थेत असल्यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीत घुसत असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती. वन्यप्राण्यांचा मार्ग बंद झाल्याने प्राणी अडकून राहतात. यासाठी हा दरवाजा सतत उघडा असणे गरजेचे आहे, अशी मागणी होत होती. त्यामुळे बुधवारी प्रशांत बोबडे, सचिन कल्याणी, दिग्विजय तोडकर या काही प्राणिमित्रांनी दुपारी हा दरवाजा संपूर्ण उघडला. दरम्यान, दरवाजा बंद असला तरी प्राणी केवळ याच दरवाजातून ये-जा करतील असे नाही. किल्ल्यावर इतर मार्ग असल्याचे त्यांनी दाखवून दिले. शाहूनगरच्या बाजूने तटावर येणास जागा आहे. बिबट्या या बाजूने पाणी पिण्यासाठी किल्ल्यावरील बावडीशेजारील तळ्यावर जाताना लोकांनी पाहिले आहे. एक मार्ग बंद झाला तरी प्राणी दुसरा मार्ग शोधतात. दक्षिण दरवाजा प्राण्यांसाठी अपायकारक नाही आणि उपकारकही नाही, असेही प्राणिमित्रांनी सांगितले. हा नवीन दरवाजा प्रशासनाने बंद केला नव्हता. कुणीतरी अज्ञाताने हे दार बंद केले असले तरी वन्यप्राण्यांचा मार्ग खुंटत नव्हता. प्राण्यांना ये-जा करण्यासाठी किल्ल्यावर इतर मार्गही आहेतच. मात्र, सोशल मीडियावर चर्चा करण्यात जेवढा वेळ घालविला गेला, तेवढ्या वेळात किल्ल्यावर जाऊन दरवाजा उघडता आला असता.- अभिजित बापट, मुख्याधिकारी, नगरपालिकाकिल्ल्यावर पाणीसाठ्याची गरजउन्हाळ्यामुळे अजिंक्यतारा किल्ल्यावर असलेले पाणीसाठे आटले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधासाठी भटकावे लागत आहे. तसेच वणव्यामुळे झाडेझुडपे जळाली असून प्राण्यांना निवाराही राहिला नाही. दगडाच्या कपारी उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी वन्यप्राणी आसरा घेत नाहीत. वन्यजीवांसाठी किल्ल्यावर पाणीसाठ्याची गरज निर्माण झाली आहे.