शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

डफळापूरला लोकवर्गणीतून देवालयाची दुरूस्ती

By admin | Updated: December 26, 2014 00:20 IST

हेमाडपंथी बांधकाम : मंदिराकडे दुर्लक्ष; झाडाझुडपांचे साम्राज्य, गाभाऱ्याची दुरवस्था

डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील दुर्लक्षित असलेले, संस्थानकालीन हेमाडपंथी बांधकाम असलेले श्री परमानंद देवाचे मंदिर अखेरच्या घटका मोजत असताना, या मंदिराची दुरूस्ती करण्यासाठी येथील कोरे बंधू पुढे सरसावले आहेत. लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णाेध्दार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.डफळापूर येथील कोळी समाजाचे आराध्यदैवत म्हणून मानले जाणारे श्री परमानंद देवाचे मंदिर दुर्लक्षित आहे. त्याची दुर्दशा झाली आहे. या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात शंकराची पिंड भग्नावस्थेत आहे. बांधकाम जमीनदोस्त झाले आहे. पिंडीसमोरील असलेले कमानीचे कोरीव बांधकाम आजही बघण्यासारखे आहे. या मंदिराचा काही भाग कोसळलेला आहे. पूजाअर्चा होत नसल्यामुळे स्वच्छतेचा अभाव असल्याने मंदिरात झाडेझुडपे उगवलेली होती. डफळापूर येथील अशोक कोरे व श्रीकांत कोरे यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णाेध्दार करण्याचा संकल्प केला. त्यानुसार या मंदिरातील झाडेझुडपे काढण्यात आली. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. (वार्ताहर)