शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे कासला मशिनरींची धडधड थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:56 IST

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन कास धरणाची उंची वाढविण्याचे काम १ मार्च २०१८ पासून युद्धपातळीवर सुरू झाले ...

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन कास धरणाची उंची वाढविण्याचे काम १ मार्च २०१८ पासून युद्धपातळीवर सुरू झाले आहे. आत्तापर्यंत एकूण धरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच धरणाचे मातीकाम ९५ टक्के पूर्ण झाले असून, पिचिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मान्सूनचा पाऊस दाखल होत असल्याने धरणाचे काम पावसाळा संपेपर्यंत थांबविण्यात आले असून, दिवाळीनंतर कामास पुन्हा वेग येणार आहे.सातारा शहराला कास, शहापूर योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. कास ही सर्वात जुनी पाणी पुरवठा योजना आहे. उन्हाळा सुरू होताच पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागते. पाणीसाठा शेवटी-शेवटी पाच ते सहा फुटांवर येतो. यंदाच्या वर्षी अगदी साडेतीन फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक होता. वाढते शहरीकरण आणि पाण्याची दैंनदिन गरज पाहता १ मार्च २०१८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.धरणाची उंची वाढविण्याच्या कामी आत्तापर्यंत मातीकाम, रॉकटो (दगडी कोपरा), ट्रॅशरॅक स्ट्रक्चर, एलड्रेन व क्रॉस ड्रेनचे काम पूर्ण झाले आहे. तसेच शीर्षविमोचकाच्या पाईपलाईन अंथरण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या शीर्षविमोचकाच्या कामी पाईपलाईन अंथरण्यासाठी चारही बाजूला क्राँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. वरच्या बाजूला (उर्ध्व बाजू-पाण्याकडची बाजू) धरणाच्या पोटात सत्तर मीटर लांबीची लोखंडी पाईप अंथरली आहे. अधो बाजूकडील म्हणजेच पाटाकडेच्या बाजूचे साधारण तीस मीटर लांबीची लोखंडी पाईपलाईन व काँक्रिटीकरणचे काम झाले आहे. उर्वरित काम दिवाळीनंतर सुरू करण्यात येणार आहे.सर्व्हिस गेट व इमर्जन्सी गेट खाली-वर होण्यासाठी स्लॉट बसवण्यात आले आहेत. या गेटचे काम दिवाळीनंतर करण्यात येणार आहे. एकंदरीत धरणाचे वीस टक्के काम शिल्लक असून, मे २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. सांडव्याचे खोदकाम झाले असून, उर्वरित सांडव्याचे काम दिवाळीनंतर केले जाणार आहे. त्यामुळे धरणात मोठा पाणीसाठी होण्याची संकेत मिळत आहे.विहिरीचे काम एक मीटरपर्यंत पूर्णविहिरीचे काम जमिनीच्या वर एक मीटरपर्यंत झाले असून, त्यावर सुरक्षिततेसाठी लोखंडी प्लेटा टाकून झाकण्यात आले आहे. तसेच तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्याच्या वाहणाºया पाण्याने धरणाला कोणतेही नुकसान पोहोचणार नाही, याची जलसंपदा विभागाकडून दक्षता घेतली आहे.