शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

बारमाही पाणी असूनही कामे रखडली--धैर्यशील कदम :

By admin | Updated: August 18, 2014 23:24 IST

धैर्यशील कदम : तारळी वळण बंधाऱ्याला विद्यमान लोकप्रतिनिधींमुळे खो बसल्याची टीका

तारळे : ‘आपल्याच हक्काचे पाणी आपल्याला मिळत नाही. तारळीचा उद्भव आपल्या येथूनच होतो; पण त्याचा उपयोग आपल्यासाठी होत नाही. आपण सर्वांनी साथ आणि संधी दिली तर येणाऱ्या वर्षभरात तारळी वळण बंधाऱ्याचे पाणी आपल्या शिवारात आलेले दिसेल,’ अशी ग्वाही धैर्यशील कदम यांनी दिली.राष्ट्रीय काँग्रेसच्या संवाद यात्रेत रामकृष्णनगर, काशीळ, गांधीनगर, पाली, हरपळवाडी चोरे, मरळी या गावांतील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी मारुतीशेठ जाधव, हिंदुराव चव्हाण, संपतराव माने, सुदाम दीक्षित, भीमराव डांगे, मधुकर जाधव, वसंतराव पाटील, शैलेश चव्हाण, धैर्यशील सुपले, अजय माने, कॅप्टन इंद्रजित जाधव, हेमंत जाधव, विकास जाधव, उमेश ताटे, सुहास पिसाळ, समीर शिकलगार, निवास घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.कदम म्हणाले, ‘१९६४ साली यशवंतराव चव्हाण यांनी तारळी वळण बंधारा मंजूर केला; परंतु तारळीचे पाणी बारमाही वाहत नाही. या कारणास्तव ही योजना १९८५ साली बंद झाली; परंतु आज ही नदी बारमाही वाहून देखील कारखान्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या उपसा सिंचन योजना बंद पडू नयेत म्हणून तारळी वळण बंधाऱ्याचे काम आजपर्यंत होऊ दिले नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राजेंद्र मुळक यांच्या आदेशाने या योजनेसाठी २५ लाख मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधींनी तारळी वळण बंधाऱ्याचे काम आजपर्यंत होऊ दिले नाही. त्यामुळे आपल्या हक्काचे असणारे ६४ एम. सी. एफ. पाणी काम पूर्ण नसल्यामुळे सांगली म्हैसाळ-ताकारीला जाते. यावेळी मारुतीशेठ जाधव, हिंदुराव चव्हाण, संपतराव माने, सुदाम दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. संवाद यात्रेस चेअरमन रघुनाथ काळभोर, सदस्य बबन काळभोर, लिंबाचीवाडी सरपंच माणिक शिंदे, चंद्रकांत जाधव, दत्तात्रय जाधव, डी. एम. मोरे, एन. एस. मोरे, हणबरवाडी सरपंच जयसिंगदादा , निगडी सरपंच निवास घोलप, पांडुरंग घोलप, मारुती पाटील, शंकर जाधव, समाधान कोळेकर, धनंजय जाधव, माधव माने यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षमतदारसंघाच्या चारही तालुक्यांतील वाडीवस्ती व सर्व गावांतील जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न जाणून घेतल्यानंतर या मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मूलभूत व प्राथमिक प्रश्नाची सोडवणूक करण्याकडेही दुर्लक्ष केल्याचे दिसते आणि हीच सामान्य व भोळीभाबडी जनता आता संघटित झाली आहे. जनतेमधील लोकप्रतिनिधीबद्दल असलेला असंतोष मला त्यांच्या डोळ्यांमध्ये स्पष्टपणे पाहावयास मिळत आहे.