शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुरुमाच्या भरावामुळे कोयनाकाठ धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:51 IST

तांबवे : येथील कोयना नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी नदीच्या पात्रात मुरुमाचा भराव टाकण्यात आला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे तसेच कोयना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने तांबवे बाजूची मळी नावाची शेतजमीन पाण्याच्या प्रवाहाने तुटून गेली आहे. या कोयना नदीकाठी केलेल्या मुरूम व माती उत्खनानंतर ठेकेदाराने ...

तांबवे : येथील कोयना नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी नदीच्या पात्रात मुरुमाचा भराव टाकण्यात आला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे तसेच कोयना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने तांबवे बाजूची मळी नावाची शेतजमीन पाण्याच्या प्रवाहाने तुटून गेली आहे. या कोयना नदीकाठी केलेल्या मुरूम व माती उत्खनानंतर ठेकेदाराने वेळेत भराव न काढल्याने जमीन वाहून जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.तांबवे गाव कोयना नदीकाठी वसलेले आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते. नदीकाठची शेतजमीन पाण्याखाली जाते. येथील पूल ही पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होते. म्हणून येथे १२ कोटी ९६ लाख रुपयांचा नवीन उंच मोठा पूल मंजूर झाला आहे. त्याचे काम गतवर्षीपासून सुरू आहे. या पुलाचे काम एका कंपनीकडे आहे. या पुलाच्या कामासाठी नदीमध्ये भराव करून काम केले आहे. पुलाचे पिलरचे काम पूर्ण झाले. आता पुलाचे कामही पूर्णत्वाकडे आले आहे.पाऊस भरपूर पडल्याने व कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा वेग हा जादा झाला आहे. एका बाजूला भराव असल्याने तांबवेच्या बाजूला पाण्याची वेग मर्यादा वाढल्याने शेतजमीन वाहून गेली आहे. मळीची जमीन सुमारे दहा ते पंधरा फूट तुटून वाहून गेली आहे. ठेकेदाराने वेळीच भराव न काढलेल्यामुळे ही जमीन तुटली असल्याचा असा आरोप शेतकºयांनी केला आहे. शेतकºयांनी संबंधित ठेकेदारास सांगूनही त्याने नदीच्या एका बाजूचा भराव काढलेला नाही. याबाबत शेतकरी नीलेशभोसले यांनी बांधकाम विभाग व ठेकेदाराला निवेदन व माहिती दिली आहे.तरीही याकडे बांधकाम विभागातील अधिकारी व संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात आहे. आता पुलाचे कामही झाले आहे. त्यामुळे तातडीने नदीमधील भराव काढून टाकण्यात यावा व बाधित शेतकºयांना त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.नदीकाठाचे नुकसान तर नव्या रस्त्याची दुरवस्थातांबवे-साकुर्डी फाटा या दरम्यानच्या रस्त्याचे गत काही महिन्यांपूर्वीच काम करण्यात आले होते. ठेकेदाराकडून या मार्गावर नवीन पद्धतीने रस्ता केला होता. मात्र, वाळू तसेच माती वाहतूक करणाºयांमुळे या रस्त्याची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. तांबवे येथील जुन्या पुलालगत रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने त्यातून रात्रीच्यावेळी दुचाकी वाहनचालक भरधाव जात असताना घसरून किरकोळ जखमीही झालेले आहेत.