शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

गिरिशिखरावरील नंदनवनात धुक्याची दुलई..

By admin | Updated: May 20, 2016 00:02 IST

महाबळेश्वरचा उन्हाळी हंगाम : वातावरणातील बदलाने पर्यटक सुखावले; आठ दिवसांत एक लाख पर्यटकांची हजेरी

महाबळेश्वर : उष्णतेच्या तीव्र लाटेत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश होरपळून निघाला असताना थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा पारा मात्र खालावला आहे. सायंकाळ होताच या ठिकाणी धुक्याची दुलई पसरत असून, हवेत गारवा निर्माण होत आहे. वातावरणातील या बदलाने पर्यटक सुखावले असून, पर्यटक अल्हाददायी वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल एक लाख पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट दिली आहे.महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटकांच्या आकर्षणाची मुख्य केंद्रे आहेत. दरवर्षी लाखो देशी, विदेशी पर्यटक याठिकाणी येऊन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात. एप्रिल-मे असा सलग दोन महिने महाबळेश्वरचा मुख्य हंगाम असतो. या महिन्यात महाबळेश्वरला सर्वाधिक पर्यटक भेटी देतात. सध्या संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. महाबळेश्वरचा पाराही वाढला होता; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पारा खालावला आहे. सायंकाळ होताच शहरासह परिसरात दाट धुके पसरत असून, हवेत गारवा वाढत आहे. ऐन उन्हाळ्यात झालेल्या वातावरणातील या बदलाचा आनंदही पर्यटक मनसोक्त लुटत आहेत. वेण्णा लेक, क्षेत्र महाबळेश्वर, आॅर्थरसीट, केटस पॉइंट, लॉडविक पॉइंट, मुंबई पॉइंट पर्यटकांना आकर्षित करत असून, या पॉइंटवर पर्यटकांची दिवसभर गर्दी होत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये राज्यासह परराज्यातील सुमारे एक लाख पर्यटकांनी या ठिकाणी हजेरी लावली. (प्रतिनिधी)बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढालपर्यटकांच्या सेवेसाठी महाबळेश्वरची बाजारपेठ सज्ज झाली असून, राजस्थानी, बंगाली, काश्मिरी, मणिपुरी अशा विविध वस्तूंना पर्यटकांमधून मोठी मागणी आहे. तसेच स्ट्रॉबेरीपासून तयार करण्यात आलेले पदार्थ तसेच चना, चिक्की, चपला व कपडे यांनाही मोठी मागणी आहे. या वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून बाजारपेठेत दररोज कोट्यवधींची उलाढाल होत आहे. नौकाविहारासाठी गर्दी वेण्णा लेक हा पर्यटकांच्या आकर्षणाचा व महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. महाबळेश्वरला येणारा प्रत्येक पर्यटक याठिकाणी नौकाविहार केल्याशिवाय परतीचा प्रवास करीत नाही. वेण्णा लेक येथे सकाळपासूनच पर्यटकांची नौकाविहारासाठी गर्दी होत असून, सायंकाळी तिकीट काढण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागत आहेत.